छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीनंतर मराठवाड्यातील ४६ मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. विभागात आजवर मतदारांचा आकडा १ कोटी ५६ लाख ३६ हजार ४६४ वर गेला आहे. लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत २ लाख ४२ हजार ३५२ मतदार वाढले आहेत. मतदार केंद्रांची संख्या आता १६ हजार ८२६ एवढी झाली आहे. पुरुष मतदार ८१ लाख ४८ हजार ७६३ आणि महिला मतदार ७४ लाख ८७ हजार १८९, तर इतर मतदार ५१२ असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
६४३ केंद्र वाढलीलोकसभेला शहरी भागात मतदानाचा टक्का घसरला. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत १६ हजार १८३ केंद्र होती. आता १६ हजार ८२६ केंद्र झाली आहेत. ६४३ केंद्र वाढली आहेत.
मतदान केंद्रांची संख्या :जिल्हा - मतदानकेंद्र संख्याछत्रपती संभाजीनगर : ३,२६४जालना : १,७५५परभणी : १,६२३हिंगोली : १,०१५नांदेड : ३,०८८लातूर : २,१४२धाराशिव : १,५२३बीड : २,४१६एकूण : १६,८२६
मतदारांच्या संख्येत राजधानी आघाडीवरछत्रपती संभाजीनगर : ३१ लाख ४५ हजार २०३जालना : १६ लाख २३ हजार ९४३परभणी : १५ लाख ३२ हजार ३०७हिंगोली : ९ लाख ७४ हजार ५४१नांदेड : २७ लाख ५१ हजार ६३८लातूर : २० लाख १६ हजार ९९०धाराशिव : १३ लाख ९४ हजार १२बीड : २१ लाख ९७ हजार ८३०