शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

असंघटित कामगारांना विम्याचे कवच; एकही पैसा न भरता दोन लाखांचा विमा

By साहेबराव हिवराळे | Published: December 08, 2023 6:51 PM

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून २ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा मोफत देण्यात आलेला आहे.

छत्रपती संभाजीनगर : असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यावर नोंदणी करणाऱ्या कामगारांना एकही पैसा न भरता दोन लाखांचे विमा कवच दिले जाते. त्यांना अपघात प्रसंगी आणि दवाखान्यात उपचारासाठीचा उपक्रम त्यात जोडलेला आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून २ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा मोफत देण्यात आलेला आहे. नोंदणी दरम्यान पूर्ण डाटा सरकारकडे लिंक असून, त्याचा तुम्हाला फायदा होतो.

काय आहे ई-श्रम पोर्टल?ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यावर सर्वप्रथम ई-श्रम पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यावर संगणकावर ई-श्रम ॲप्लिकेशनवर नोंदणी होते किंवा एखाद्या सेंटरवरही नोंदणी करू शकता. आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईलवर ही नोंदणी होते. त्याचे संदेश येतात.

ई-श्रम पोर्टलवर दीड लाख कामगारांची नोंदणीआधारकार्ड व मोबाईल नंबर त्यासोबत लिंक करणे जरुरी आहे. शहरात दीड लाखापेक्षाही अधिक कामगारांनी ई-श्रम नोंदणी केलेली आहे. एक पैसाही न भरता हा अपघात विमा यात जोडलेला आहे. अतिगंभीर प्रसंगी हा मदतीला येतो.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी कशी कराल?स्वत:च्या मोबाईलवर ॲप्लिकेशन डाऊनलोड करून किंवा सेतू सेंटरवरही आधारकार्डचा नंबर जोडून नोंदणी करता येते. असंघटित कामगारांसाठी ही आरोग्य संजीवनीच असल्याचे मानले जाते.

नोंदणीसाठी निकष काय?ई-श्रम पोर्टलवर कुणीही असंघटित क्षेत्रातील १८ वर्षांवरील कुणीही मजूर नोंदणी करू शकतो. ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यावर आरोग्यविषयक योजनेचे लाभ मिळतात.

हंगामी मजुरांनी फायदा घ्यावा...सरकारने हंगामी मजुरांसाठी ई-श्रम नोंदणी सुरू केलेली आहे. त्यांना त्या बदल्यात बांधकाम साहित्य व इतर योजना देखील दिल्या जातात. आरोग्य विमा देखील २ लाखांपर्यंत मोफत असून, काम करताना अपघात झाल्यास त्याचे प्राण वाचण्यासही हातभार लागतो.- कामगार कल्याण अधिकारी

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद