शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

राज्यभर २ लाखांवर लायसन्सची छपाई प्रलंबित; मेसेज दाखवायची वेळ, वाहनचालक त्रस्त

By संतोष हिरेमठ | Published: September 26, 2023 6:52 PM

माहिती अधिकारातून उघड, लायसन्स कधी मिळेल? रस्त्यावर पोलिस मामा पकडतात हो!

छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयात टेस्ट दिली आणि पासही झाले. तरीही राज्यभरातील दोन लाखांवर वाहनधारकांना लायसन्सची प्रतीक्षाच करावी लागत आहे. कारण लायसन्सची छपाईच प्रलंबित असल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आले. लायसन्स कधी मिळेल, रस्त्यावर वाहतूक पोलिस पकडतात, असे म्हणत दररोज अनेक जण राज्यभरातील आरटीओ कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत.

नव्या रूपातील वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) आणि वाहन परवान्याच्या (लायसन्स) छपाईला ऑगस्टमध्ये सुरुवात झाली आहे. नव्या रूपातील लायसन्स, ‘आरसी’वर ‘चीप’ऐवजी बारकोड पाहायला मिळत आहे. नव्या रूपातील आरसी, लायसन्स वाटपास जुलैपासून सुरुवात होणार होती; परंतु, जवळपास दीड महिन्यानंतर अखेर त्याची सुरुवात झाली. परिणामी, राज्यभरात हजारो वाहनचालकांना लायसन्ससाठी नुसती प्रतीक्षा करण्याची वेळ ओढावत असल्याची परिस्थिती आहे.

महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेचे उपाध्यक्ष विठ्ठल मेहता यांनी लायसन्सच्या छपाईच्या परिस्थितीविषयी माहिती अधिकारात विचारणा केली होती. त्यांना दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात माहिती देण्यात आली. दाेन लाख ९८ हजार ६७२ इतक्या लायसन्सची छपाई प्रलंबित असून, नव्या सेवापुरवठादारामार्फत छपाईचे काम सुरू करण्यात आले, अशी माहिती त्यांना परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.

मोबाइलवरचा मेसेज दाखविण्याची वेळलायसन्स मंजूर झाल्यानंतर वाहनचालकाला मोबाइलवर मेसेज पाठविला जातो. वाहतूक पोलिसांनी लायसन्सची विचारणा केली तर मोबाइलवरील मेसेज दाखवून दंडापासून सुटका करून घेण्याची वेळ वाहनचालकांवर ओढावत आहे.

वेळेवर लायसन्स मिळावेलायसन्स ॲप्रूव्हल झाल्यानंतर ठरावीक कालावधीत आणि वेळेवर ते मिळणे, हा उमेदवारांचा हक्क आहे. माहितीच्या अधिकारातून राज्यात दाेन लाख ९८ हजारांवर लायसन्सची छपाई प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.-विठ्ठल मेहता, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRto officeआरटीओ ऑफीसtraffic policeवाहतूक पोलीस