वसमत : येथे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप यांच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. ही कारवाई ५ आॅगस्ट रोजी करण्यात आली. मागील काही दिवसांपासून वसमत शहरामध्ये घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांनी नागरिकांसह पोलिसांनाही हैराण केले होते. सातत्याने घरफोड्या होऊ लागल्याने एकप्रकारे पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान निर्माण केले होते. २६ जुलै रोजी वसमत शहरातील बँक कॉलनी भागातील रहिवासी अशोक गंगाधरसा सातपुते यांच्याकडे घरफोडी झाली. त्यामध्ये एकूण २ लाख ३६ हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. पोलीस उपअधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि शंकर सिटीकर, वसमतचे निरीक्षक रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तीने विशेष पथके स्थापन करून निजामाबाद, बुलडाणा, सेलू, पाथरी व औरंगाबाद येथे रवाना करण्यात आली. या पथकांनी आरोपी लक्ष्मण बाबू चव्हाण (रा. इंदिरानगर, पाथरी, जि. परभणी), किशोर मुंगनाथ शिंदे (रा. देऊळगाव राजा जि. बुलडाणा) यांना सदर गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईत जमादार शेख रहीम, पोना शेख बाबर, शेषराव लाखाडे, सचिन शिंदे, अरशद खान, पोकॉ सतीश तावडे, सचिन बिजले, सिद्धोधन गोले, गजानन देशमुख यांनी भाग घेतला.(वार्ताहर)कौडगावात विनयभंगहट्टा : वसमत तालुक्यातील कौडगाव येथे २६ वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना ४ आॅगस्टच्या रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सिद्धार्थ कुंडलिक सोनवणे (रा.कौडगाव) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदरील महिला घरासमोर बाजेवर झोपलेली असताना आरोपीने विनयभंग केला. तिने आरडाओरड केली असता त्याने चाकूने मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.(वार्ताहर)
घरफोडी करणारे २ चोरटे जेरबंद
By admin | Published: August 05, 2014 11:49 PM