शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

रस्त्यांसाठी २०० कोटींचा प्रस्ताव

By admin | Published: October 04, 2016 12:30 AM

औरंगाबाद : जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हा ग्रामीण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २०० कोटी रुपयांची गरज

औरंगाबाद : जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हा ग्रामीण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २०० कोटी रुपयांची गरज जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन व बांधकाम सभापती संतोष जाधव यांनी व्यक्त केली आहे. उद्या मंगळवारी औरंगाबादेत मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. त्यावेळी संबंधित मंत्र्यांना यासंबंधीचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. जिल्ह्यात ६ हजार ६८१ किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते आहेत. अलीकडच्या काळात या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब झाली असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी मिळणारा निधी हा अत्यंत खूप कमी असतो. त्यामुळे शासनाने यंदा किमान २०० कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर करावा, अशी विनंती या प्रस्तावाद्वारे शासनाला करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मंजूर १८८ तीर्थक्षेत्रांचा विकास निधीअभावी रखडला आहे. जिल्हा वार्षिक योजनेमधून मागणीनुसार किमान २५ कोटी रुपये मंजूर करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेची सध्याची प्रशासकीय इमारत तब्बल ११० वर्षे जुनी आहे. इमारतीच्या डागडुजीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो. प्रशासकीय इमारत उभारणीसाठी २००० साली उपकरातून १० कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजनही झाले होते. तथापि, उपकरातून एवढा मोठा निधी उपलब्ध न झाल्याने ते काम रेंगाळले. सध्याच्या इमारतीच्या जागेवर जुनी बांधकामे पाडून किंवा पाणचक्की रोडलगत असलेल्या जि. प. मालकीच्या जागेवर इमारत उभारण्याचा विचार आहे. त्यासाठी ३० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. रस्त्यांबरोबर पुलांच्या दुरुस्तीची गरज आहे. जि. प. बांधकाम विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ८२ पुलांची तातडीने दुरुस्ती करावी लागणार आहे. यासाठी ३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दुसरीकडे १७ व १९ सप्टेंबर रोजी औरंगाबाद आणि फुलंब्री या दोन तालुक्यांत अतिवृष्टी झाली होती. पूर हानीमुळे रस्ते व पुलांची परिस्थिती वाईट झाली असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी ७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. शासनाने असे एकूण १० कोटी रुपये मंजूर करण्याची विनंती अध्यक्ष महाजन व सभापती संतोष जाधव हे मंत्र्यांना करतील.