शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

गायब झालेल्या २ हजाराच्या नोटा अवतरल्या; बाजारात दररोज २ कोटीची गुलाबी रोकड गल्ल्यात

By प्रशांत तेलवाडकर | Published: May 26, 2023 11:53 AM

नोट बदलण्यासाठी काही बँकेत, वीजबिल केंद्रावर मागितले जातेय आधारकार्ड

छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी व्यवहारातून गायब झालेल्या २ हजाराच्या गुलाबी नोटा पुन्हा एकदा बाजारपेठेत अवतरल्या आहेत. ग्राहकही बँकेत नोटा बदलून घेण्याऐवजी व्यवहारात गुलाबी नोट देणे पसंत करीत आहेत. यामुळे पेट्रोलपंपापासून ते किराणा दुकानापर्यंत दररोज कमीत कमी २ कोटी मुल्याच्या गुलाबी नोटा चलनात येत असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया यांनी व्यक्त केला आहे.

व्यापाऱ्यांना नकली नोटांची भीती२ हजारांच्या नोटा ३० सप्टेंबरनंतर व्यवहारातून बाद होणार आहेत. तोपर्यंत या गुलाबी नोटा व्यवहारात चालणार आहेत. यामुळे व्यापारी गुलाबी नोटा स्वीकारत आहेत. यास काही व्यापारी अपवादही आहेत. ते गुलाबी नोटा स्वीकारण्यास तयार नाहीत. असली की नकली २ हजारची नोट तपासणीसाठी त्यांच्याकडे मशिन नाही, २ हजारची एखादी नोट नकली आली तर नंतर कोण भरून देणार, अशी कारणे व्यापारी सांगत आहेत. मात्र, नेहमीच्या ओळखीच्या ग्राहकांकडून गुलाबी नोटा ते स्वीकारत आहेत. काही व्यापारी आधारकार्डची झेरॉक्स मागत असल्याचे दिसून आले. व्यापाऱ्यांमध्ये नकली नोटांविषयी भीती पाहण्यास मिळाली.

काही बँका मागताहेत आधार, पॅन कार्डस्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक व आदी राष्ट्रीयीकृत बँकांचा अपवाद वगळता, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व अन्य बँकेत २ हजारची नोट बदलून देण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड मागताना दिसून आले.

करन्सीचेस्टमध्ये ६ कोटी जमाएसबीआयच्या करन्सीचेस्टमध्ये आतापर्यंत २ हजार रुपयांच्या सहा कोटीच्या नोटा जमा झाल्या आहेत. यात काही शहरी व ग्रामीण भागातील बँकेच्या शाखांचाही समावेश आहे. त्यांनी २ हजारचे बंडल बँकेत आणून जमा केली. तसेच ग्राहकही आपल्या खात्यात नोटा जमा करीत आहेत, असे सुत्रांनी सांगितले.

बँकेत येणारे ८० टक्के ग्राहक खात्यात जमा करताहेत गुलाबी नोटासेंट्रल बँकेच्या कॅशिअरने सांगितले की, दिवसातून एका शाखेत दोन ते अडीच लाखांच्या २ हजारच्या नोटा जमा होत आहेत. त्यातील ८० टक्के ग्राहक आपल्या खात्यातच गुलाबी नोटा जमा करीत आहेत. उर्वरित २० टक्के लोक नोटा बदलून घेत आहेत.

वीजबिल केंद्रांवर वादावादीकाही वीजबिल केंद्रांवर बिल भरताना २ हजाराच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने ग्राहक व कर्मचाऱ्यांत शाब्दिक वादावादी होत आहे. अखेर काही केंद्रांवर फलक चिटकविण्यात आले आहेत. २ हजारच्या नोटा असतील तर त्यासोबत आधारकार्ड आणि पॅनकॉर्डची झेरॉक्स सोबत आणावी व नोटाचे सीरियल नंबर लिहून द्यावे.

टॅग्स :MONEYपैसाAurangabadऔरंगाबादMarketबाजारDemonetisationनिश्चलनीकरण