शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

२०० कि.मी. अंतर १३ तासांत केले पार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 8:25 PM

ध्येयवेड्या माणसांसमोर अशक्य गोष्टीही सहज शरण येतात. जिद्दीच्या बळावर ध्येयाने झपाटलेला माणूस म्हणजे सायकलपटू अभिजित बंगाळे. औरंगाबादेतील बंगाळे यांनी लहान मुलांसाठी असलेल्या २० इंची सायकलवरून १३ तासांत २०० किमी अंतर लीलया पार केले. छोट्या सायकलवरून हा लांबचा पल्ला गाठणारे बंगाळे हे मराठवाड्यातील पहिलेच सायकलपटू आहेत. त्यांच्या २० इंची सायकलवरील यशासमोर आकाशही ठेंगणे झाले आहे.

ठळक मुद्दे२० इंची सायकलसमोर आकाशही ठेंगणे : औरंगाबादच्या अभिजित बंगाळे यांच्या जिद्दीची कथा

जयंत कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ध्येयवेड्या माणसांसमोर अशक्य गोष्टीही सहज शरण येतात. जिद्दीच्या बळावर ध्येयाने झपाटलेला माणूस म्हणजे सायकलपटू अभिजित बंगाळे. औरंगाबादेतील बंगाळे यांनी लहान मुलांसाठी असलेल्या २० इंची सायकलवरून १३ तासांत २०० किमी अंतर लीलया पार केले. छोट्या सायकलवरून हा लांबचा पल्ला गाठणारे बंगाळे हे मराठवाड्यातील पहिलेच सायकलपटू आहेत. त्यांच्या २० इंची सायकलवरील यशासमोर आकाशही ठेंगणे झाले आहे.सात वर्षांपासून सायकल चालवण्याची आवड असलेल्या अभिजित बंगाळे यांनी लहान मुले चालवतात त्या २0 इंची उंचीच्या सायकलवर २00 कि.मी. अंतर पूर्ण करण्याचा निर्धार केला. तसे पाहता नॉर्मल सायकलची उंची ही साधारणत: २८ इंच असते. २0 इंच सायकल तयार करणाऱ्यांनी ही सायकल जास्तीतजास्त १0 कि.मी. अंतरच चालवू शकता, असे सांगितले;परंतु अभिजित बंगाळे यांनीआॅडेक्स इंडियातर्फे आयोजित२00 कि.मी. अंतर या छोट्याउंचीच्या सायकलवर पूर्ण करण्यास गुरुवारी सकाळी ६ वाजता क्रांती चौक येथून प्रारंभ केला. जाताना थंड हवा आणि पोषक वातावरणामुळे त्यांनी नगर जिल्ह्यातील टोलनाका सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी गाठला. परतीचा मार्ग मात्र क्षमतेचा कस घेणाराच होता.सायकल २0 इंच उंचीची असल्यामुळे सीट खाली करून चालवली, तर गुडघ्यावर प्रचंड ताण यायला लागला, तर सीट वर करून चालवली, तर पाठीवर ताण पडू लागला. त्यातच येताना वाहनांची प्रचंड वर्दळ. त्यासोबतच प्रचंड ऊन, विरुद्ध दिशेने वाहणारे वारे यांची तमा न बाळगता अभिजित बंगाळे यांनी जिद्दीच्या जोरावर छोट्या सायकलवरही २00 कि.मी. अंतर १३ तासांत पूर्ण करण्याची किमया साधली.सायंकाळी ७ वाजता ते क्रांती चौक येथे पोहोचले. विशेष म्हणजे आॅडेक्स इंडियातर्फे २00 कि.मी. अंतर हे साडेतेरा तासांत पूर्ण करायचे होते. मात्र, त्यांनी हे अंतर केवळ तेरा तासांतच पूर्ण केले. विशेष म्हणजे एनर्जिल व इलेक्ट्रॉल या ऊर्जा वाढवणाºया द्रव्यांचाही त्यांनी उपयोग केला नाही.भारतात २0 इंच उंचीच्या सायकलवर २00 कि.मी. अंतर पूर्ण करणारे जवळपास कोणीही नाही. आपण आता लिम्का बुक आॅफ रेकॉर्डसाठी प्रयत्न करणार आहोत. याआधीही आपण २00, ४00 व ६00 कि.मी. अंतर हे सायकलवरून यशस्वीपणे पूर्ण केले आहे. आता माझे लक्ष्य सायकलवरून १,000, १,२00, १,४00 कि.मी. अंतर पूर्ण करण्याचे आहे.- अभिजित बंगाळे (सायकलपटू)