लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्टÑीय आरोग्य अभियान अंतर्गत बाल स्वास्थ्य कार्यक्रमच्या वैद्यकीय पथकाकडून ० ते १८ वयोगटातील संदर्भित संशयित २०३ हृदयरूग्ण मुला-मुलींची जिल्हा रूग्णालयात २९ जुलै रोजी २डी-इको मोफत तपासणी करण्यात आली. आरोग्य विभागाचा उपक्रम बालकांसाठी संजीवनी ठरत आहे. रुग्णांची तपासणी मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टर भूषण चव्हाण, डॉ. पंकज शहा यांच्यामार्फत करण्यात आली. सदर शिबिराचे उद्घाटन आ. तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी के. के. शिंदे, गोविंद भवर, रामचंद्र वैद्य, डॉ. बी. बी. रोडगे, डॉ. सी. डी. शेरखाने, डॉ. मेहत्रे, डॉ. विठ्ठल रोडगे, बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी हजर होते. तपासणीदरम्यान बालकांच्या पालकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. उपक्रमामुळे जिल्ह्यातील गरजू रूग्णांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळत आहे. यशस्वीतेसाठी अधिपरिचारीका आशा क्षीरसागर, लक्ष्मण गाभणे, ज्ञानोबा चव्हाण, तसेच वैद्यकीय पथकातील अधिकारी, कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत तपासणी मोहीम सुरू होती.
२०३ बालकांचा मोफत टूडी-इको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:47 AM