जालना : राहत सोशल गु्रपच्या वतीने आयोजित ११ व्या सामूहिक विवाह सोहळ्यात रविवारी २१ जोडपे विवाहबद्ध झाले. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा येथील आझाद मैदानावर पार पडला.अध्यक्षस्थानी माजी आमदार कैलास गोरंट्याल होते. यावेळी उद्योजक सुरेश अग्रवाल, एकबाल पाशा, मौलाना कारी मोहम्मद अली, शम्स जालनवी, मौलाना अ. रहेमान, मौलाना अ. वाहेद, मिर्झा अन्वर बेग, सैय्यद जाकेर, हाफिज मुमताज, सत्संग मुंडे, मोहम्मद फेरोज सौदागर, अॅड. सोहेल सिद्दिकी, श्यामराव आल्हाट, रवि गोल्डे, खालेद कुरैशी, बदर चाऊस, आरेफखान, मोहन इंगळे, डॉ. मुशीद इनामदार, विनीत साहनी, जिशान आदींची उपस्थिती होती.नूतन २१ जोडप्यांना संस्थेच्या वतीने जीवनोपयोगी वस्तू भेट स्वरूपात देण्यात आली. प्रारंभी हाफिज अ. जब्बार यांनी कुराण पठण केले. लियाकत अली खान यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी फेरोज बागवान, शेख अफसर, सलीम पठाण, शेख सलीम, सलीम मोमीन, शेख मोहम्मद, शेख एजाज, सैय्यद खालेद, अहमद जागीर, सईद अहेमद, शेख वसीम, कलीम पठाण, अजीज पठाण, शेख महेबूब, सैय्यद शाकेर शेख जमीर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्यात २१ जोडपे विवाहबद्ध
By admin | Published: December 29, 2014 12:43 AM