औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी १,४०६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ६३६ जणांना सुटी देण्यात आली. तर २४ तासांत औरंगाबाद जिल्ह्यातील २० आणि अन्य जिल्ह्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ११,८१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ६८ हजार ७६० झाली आहे, तर आतापर्यंत ५५ हजार ५०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत १,४३९ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,४०६ रुग्णांत मनपा हद्दीतील १,०१९ तर ग्रामीण ३८७ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५०० आणि ग्रामीण १३६, अशा ६३६ रुग्णांना सुट्टी देण्यात आली.
उपचार सुरू असताना अंगुरीबाग येथील ९३ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ७७ वर्षीय महिला, नारळीबाग येथील ६५ वर्षीय पुरुष, पडेगाव येथील ५० वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ७३ वर्षीय पुरुष, हर्षनगर, लेबर कालनी येथील ७० वर्षीय पुरुष, कन्नड येथील ३० वर्षीय पुरुष, इंदिरा नगर, बायजीपुरा येथील ७४ वर्षीय महिला, सिद्धार्थ काॅलनी-कन्नड येथील ७५ वर्षीय पुरुष, कैसर काॅलनीतील ६० वर्षीय महिला, शिवाजी नगरातील ७२ वर्षीय महिला, मांजरी, गंगापूर येथील ९१ वर्षीय पुरुष, गारखेडा परिसरातील ८८ वर्षीय पुरुष, सुदर्शन नगर येथील ८१ वर्षीय महिला, प्रताप नगरातील ५६ वर्षीय पुरुष, एन-७ येथील ५७ वर्षीय महिला, पुष्पनगरी येथील ६७ वर्षीय पुरुष, म्हाडा काॅलनी, सातारा येथील ६७ वर्षीय पुरुष, फरहत नगर, जटवाडा रोड येथील ६२ वर्षीय महिला, सातारा परिसरातील ६२ वर्षीय पुरुष आणि जालना जिल्ह्यातील ६० वर्षीय पुरुष, अहमदनगर जिल्ह्यातील ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद १९, घाटी रुग्णालय २, सिडको ४, व्यंकटेश नगर २, गुलमंडी १, नंदनवन कॉलनी १, पडेगाव ६, टी.व्ही.सेंटर १, न्यू उस्मानपुरा १, एन-२ येथे ३२, चिकलठाणा ५, एन-४ येथे १२, विश्रांती नगर १, एन-१ येथे ४, मुकुंदवाडी ११, जय भवानी नगर १२, बीड बायपास १०, हनुमान नगर २, शिवनेरी कॉलनी १, पुंडलिक नगर ६, विजयनगर २, एकविरा हॉस्पिटल १, परिजात नगर १, एन-३ येथे ८, बसैये नगर २, एन-९ येथे ८, दर्गा रोड ५, एन-८ येथे ११, गारखेडा १८, शिवकृपा निवास दत्त मंदिराजवळ ३, उत्तरा नगरी १, शिवाजी नगर ६, हर्सूल टी पाॅईंट २, म्हाडा कॉलनी मूर्जिजापूर १, मयुर पार्क ५, कामगार चौक १, हडको ३, एन-७ येथे १४, सातारा परिसर २०, सिल्कमिल कॉलनी २, विनस सोसायटी १, भानुदास नगर १, सौजन्य नगर १, बालाजी नगर २, सिविल हॉस्पिटल १, हिंदुस्थान आवास १, हरिप्रसाद नगर १, देवळाई ३, ज्योती नगर ५, देवानगरी ५, बँक कॉलनी १, नारेगाव ३, जवाहर कॉलनी ३, अलंकार सोसायटी १, भारत नगर १, तापडिया नगर २, सुहास सोसायटी ५, उल्कानगरी ९, शिवशंकर कॉलनी ३, गजानन नगर ३, प्राईड इनिग्मा २, साई नगर ४, न्यू विशाल नगर १, रेणुका नगर ५, विश्वभारती कॉलनी १, गजानन कॉलनी १, विष्णू नगर १, मित्र नगर ३, गणेश अपार्टमेंट १, गुरुदत्त नगर १, मुकुंद नगर १, राजा बाजार १, गणेश नगर १, सिंधी कॉलनी ४, अजब कॉलनी १, विशाल नगर १, एन-५ येथे २, रामनगर १, कॅनॉट प्लेस १, खडकेश्वर ३, वानखेडे नगर १, जाधववाडी ३, नवजीवन कॉलनी १, सुदर्शन नगर ४, हर्सूल १०, एन-६ येथे ११, ठाकरे नगर ४, मारुती नगर २, चिश्तिया चौक १, होनाजी नगर ३, पिसादेवी रोड १, हरसिद्धी माता नगर १, आंबेडकर नगर १, ब्रिजवाडी १, चेलीपुरा १, अक्षय पार्क १, सुवर्ण नगर २, आकाशवाणी १, न्यू एसटी कॉलनी १, पुष्पनगरी २, बंजारा कॉलनी १, पिंप्री १, गजानन मंदिर १, न्यू हनुमान नगर १, शहानूरमियॉ दर्गा १, खोकडपुरा २, पैठण गेट २, साई स्पोर्टस १, रोझाबाग १, पहाडसिंगपुरा १, रशिदपुरा १, बन्सीलाल नगर १०, छत्रपती नगर १, छावणी २, सुराणा नगर २, कांचनवाडी २, एकनाथ नगर २, समर्थ नगर ४, ईटखेडा ४, जाधवमंडी राजा बाजार १, पद्मपुरा ६, नागेश्वरवाडी २, आनंद विहार १, कासलीवाल तारांगण २, जालान नगर ३, पिरबाजार ४, प्रताप नगर ३, छत्रपती नगर १, सुराणानगर १, समाधान कॉलनी ३, उस्मानपुरा ३, बेगमपुरा १, कासलीवाल मार्बल २, अलोक नगर १, सहकार नगर १, दशमेश नगर १, न्यू श्रेय नगर १, कार्तिक नगर १, पैठण रोड २, मकाई गेट १, मुलांचे वसतिगृह १, न्याय नगर १, चेतना नगर १, श्रेय नगर २, एन-११ येथे १, एमजीएम परिसर १, नालंदा नगर १, गुरूप्रसाद नगर २, दर्जी बाजार १, सोधी हॉस्पिटल उस्मानपुरा १, आकाशवाणी १, मनजीत नगर २, कैलास नगर ३, एसबीएच कॉलनी जालना रोड १, क्रांती चौक २, स्नेह नगर २, जहागिरदार कॉलनी १, अन्य ५९२
ग्रामीण भागातील रुग्ण
गंगापूर १०, अंतरवाली खांडी १, बिडकीन १, सिडको वाळूज १, सताळ पिंप्री १, बजाजनगर ४७, शेंद्रा एमआयडीसी ४, अब्दी मंडी ३, आन्वा १, कन्नड १, मिटमिटा ४, बजरंग कॉलनी १, पिसादेवी २, पंढरपूर २, सिडको महानगर १५, तिसगाव ५, रांजणगाव १२, विजय नगर १, दौलताबाद २, खुल्ताबाद १, वडगाव कोल्हाटी ५, वळदगाव १, इटावा १, पैनगंगा हाऊसिंग सोसायटी ३, पैठण १, वाळूज १, गोरख वाघ चौक १, प्रताप चौक १, साई प्रसाद पार्क १, सारा वृंदावन सिडको १, फुलंब्री १, राजेवाडी लाडसावंगी १, मोढा १, आडगाव १, अन्य २५७.