शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

प्रोझोन मॉलमध्ये गाळा देण्याचे आमिष दाखवून २२ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 11:42 PM

प्रोझोन मॉलमध्ये दुकान (गाळा) देण्यासाठी २२ लाख १३ हजार ५०० रुपये घेऊन करार केल्यानंतर दुकान न देता फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे २०१२ साली हा करार केला, तेव्हापासून कालपर्यंत आरोपींनी दुकानाचा ताबा दिला नाही आणि पैसेही परत केले नाहीत.

औरंगाबाद : प्रोझोन मॉलमध्ये दुकान (गाळा) देण्यासाठी २२ लाख १३ हजार ५०० रुपये घेऊन करार केल्यानंतर दुकान न देता फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे २०१२ साली हा करार केला, तेव्हापासून कालपर्यंत आरोपींनी दुकानाचा ताबा दिला नाही आणि पैसेही परत केले नाहीत.सुनील अनुपेंद्रनाथ चतुर्वेदी, अखिल चतुर्वेदी, दीप सुभाष गुप्ता, निगम अनिलभाई पटेल, प्रतीक प्रकाश देसाई आणि त्याचे प्रतिनिधी यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार प्रमोदकुमार बगेश्वरनाथ रॉय हे नवी दिल्ली येथील रहिवासी असून, ते व्यवसायाने वकील आहेत. त्यांनी २०१२ मध्ये प्रोझोन मॉलमध्ये गाळा खरेदीसाठी आरोपींसोबत करार केला होता. त्यावेळी आरोपींनी त्यांच्याकडून गाळ्याची किंमत म्हणून २२ लाख १३ हजार ५०० रुपये घेतले. ही रक्कम घेतल्यानंतर मुदतीत गाळ्याचे बांधकाम करून प्रमोदकुमार यांच्या ताब्यात देणे हे आरोपींना बंधनकारक होेते. असे असताना आरोपींनी मात्र गाळ्याचे बांधकाम मुदतीत केले नाही. एवढेच नव्हे तर त्यांना गाळाही दिला नाही. यामुळे प्रमोदकुमार यांनी आरोपींकडे त्यांचे पैसे परत मागितले. त्यानंतर ते वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेत. यात करार होऊन सात वर्षे उलटल्यानंतरही आरोपी आपल्याला गाळा देत नाहीत आणि पैसेही परत करीत नाहीत, हे प्रमोदकुमार यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी आरोपींविरुद्ध पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला. हा अर्ज चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे आला. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अर्जाची चौकशी केली तेव्हा हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याविषयी आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या रिपोर्टनंतर ७ जून रोजी प्रमोदकु मार यांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीची फिर्याद एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक मीरा लाड तपास करीत आहेत.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी