शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

मराठवाड्यात २२३ मि.मी. पावसाची तूट; ४८ दिवस गेले कोरडे, आता उरले फक्त ४३

By विकास राऊत | Published: August 17, 2023 2:07 PM

आता परतीच्या पावसावरच मदार आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ७८ दिवसांत सरासरीच्या फक्त ५० टक्के पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या ७१ टक्के पाऊस झाला असला तरी नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यात पावसाने दडी मारली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील पावसाळ्यात ६७९.५ मिमी सरासरी पावसाचे प्रमाण असून, ७८ दिवसांमध्ये ३३९.९ मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी ५६२ मि.मी. पाऊस झाला होता. या तुलनेत २२३ मि.मी. पावसाची तूट आहे. खरीप हंगामातील पेरण्यांचा पहिला टप्पा संपला असून, ३० सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो असे गृहीत धरले तर आता फक्त ४३ दिवस उरले आहेत. आता परतीच्या पावसावरच मदार आहे.

पावसाळ्याचे ७८ पैकी ४८ दिवस कोरडे गेले आहेत. जून महिन्यात फक्त सात दिवस पाऊस झाला असून, २६ दिवस जुलै महिन्यात कमी-अधिक पाऊस झाला. ऑगस्टमधील १६ दिवस कोरडे गेले आहेत. यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांचे नुकसान झाले. याचा परिणाम विभागातील ८७७ मोठ्या, मध्यम व लघू जलप्रकल्पांवर झाला आहे. ४२ टक्केच उपयुक्त जलसाठा प्रकल्पात आहे.

उद्योग, पिण्याच्या पाण्यावर संकट४३ दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर पुढच्या काळात पिण्याच्या पाण्यासह उद्योगांवर जलसंकट असेल. मागील वर्षी ८६.८७ टक्के जलसाठा होता. पूर्ण प्रकल्पांमध्ये ३ द.ल.घ.मी. पाण्याची आवक मागील चार दिवसांत झाली आहे. जायकवाडी धरणात ३४.२८ टक्के पाणी आहे. सर्व प्रकल्पांत ७७.८९ टीएमसी पाणी आहे. विभागात ४८ लाख ५७ हजार हेक्टरपैकी ४३ लाख ८१ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या. गेल्या वर्षी ४८ लाख २३ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या.

जिल्हा.... झालेला पाऊसऔरंगाबाद.... २५४ मि.मी.जालना.... २५८ मि.मी.बीड.... २४६ मि.मी.लातूर.... ३२० मि.मी.धाराशिव.... २७४ मि.मी.नांदेड.... ५८२ मि.मी.परभणी.... २७६ मि.मी.हिंगोली.... ४३३ मि.मी.एकूण.... ३३९ मि.मी.

 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी