छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांवर येऊन ठेपलेली लोकसभा निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिस विभाग फ्रंट मोडवर आला आहे. शहरातील २२८, तर ११४ हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांची यादीच पोलिसांंनी तयार केली आहे. त्याशिवाय ५३ कुख्यात गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत ६ गुंडांना कारागृहात स्थानबद्ध करण्याची तयारीदेखील केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
१६ मार्च रोजी निवडणूक आयोगाकडून देशाच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली. पाच महिन्यांपासून पोलिस यंत्रणा या निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागली होती. जानेवारी महिन्यात पोलिस ठाणेनिहाय मतदान केंद्र, ईव्हीएम तयारी व पाहणी केंद्राची उभारणी, मतमोजणी केंद्राचा आढावा घेण्यात आला. गेल्या काही महिन्यांतील राजकीय ध्रुवीकरणामुळे या निवडणुकीत शांतता राखण्याचे मोठे आव्हानच पोलिसांसमोर आहे.
२६३९ गुन्हेगारांची यादी तयारशहर पोलिसांनी जानेवारीअखेर २,६३९ गुन्हेगारांची यादी तयार केली होती. त्यांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे आदेश पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहे. विशेष शाखांकडून शहरातील विदेशी नागरिकांची नव्याने अद्ययावत माहिती तयार करण्यात आली. दहशतवादविरोधी पथकाकडूनदेखील सोशल मीडिया, स्थानिक गुप्त बातमीदारांकडून माहिती गोळा केली जात आहे.
परिमंडळ १ पोलिस ठाणे हिस्ट्रीशीटर हद्दपारसिटी चौक २१ ३क्रांती चौक २१ २वेदांतनगर १ २बेगमपुरा ८ ० छावणी १० ३ एम. वाळूज २३ ९वाळूज २२ ० दौलताबाद ० ०
परिमंडळ २पोलिस ठाणे हिस्ट्रीशीटर हद्दपारसिडको २४ १ एम. सिडको २३ ०जिन्सी १८ ५ हर्सूल ३ १ मुकुंदवाडी ११ ० जवाहरनगर १४ ० उस्मानपुरा १० ३ सातारा ७ १ पुंडलिकनगर १२ १४
३ हजारांपेक्षा अधिकांवर प्रतिबंधात्मक कारवाईशहरात पाेलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्याकडून सातत्याने शहरातील प्रतिबंधात्मक कारवाया, एमपीडीएसंदर्भाने कठोर आदेश देण्यात आले आहेत. एकट्या परिमंडळ १च्या ८ पोलिस ठाण्यांतर्गत २ हजार ४१ गुन्हेगारांवर सीआरपीसी १०७, १०९ व ११० अंतर्गत कारवाई करण्यात आली. यात भविष्यात गुन्हेगार कृत्य न करण्याबाबत नोटीस बजावून अनेकांकडून बाँड घेण्यात आले. शिवाय, अनेक गुन्हेगार, समाजकंटकांना ठरावीक काळानंतर ठाण्यात हजेरी लावण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
सिल्लोड, पैठणमध्ये सर्वाधिक प्रतिबंधात्मक कारवायाउपविभाग हिस्ट्रीशीटर हद्दपार प्रतिबंधात्मक कारवाया
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण १६ ६ १९५पैठण ३१ १२ १००सिल्लोड १९ १२ २०८कन्नड २३ २ ९९वैजापूर ११ ५ १०१गंगापूर १४ ३ ६२
-२०२२च्या अभिलेखानुसार जिल्ह्यात ११२ कुख्यात गुन्हेगार सक्रिय होते. २०२३ मध्ये त्यात ६ गुन्हेगारांची भर पडली. यात प्रामुख्याने पिशोर, पैठण, पाचोड, सिल्लोडमध्ये सर्वाधिक संख्या आहे.
गुप्तचर यंत्रणांचा अलर्ट, रोज बैठकांचे सत्रकेंद्रीय गुप्तचर व तपास यंत्रणांकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला अतिसंवेदनशील यादीत समाविष्ट केले गेले आहे. परिणामी, जालना व औरंगाबाद मतदारसंघात काहीही होऊ शकते, अशी शक्यतादेखील या यंत्रणांच्या अहवालातून निदर्शनास आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्या अनुषंगाने काही दिवासांपूर्वीच बीएसएफची एक तुकडी शहरात दाखल झाली. त्याशिवाय, अलर्टनंतर पोलिस आयुक्त मनोज लोहिया, विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्याकडून सातत्याने बैठका घेऊन आढावा घेतला जात आहे.