शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

जायकवाडी धरणाच्या ४६ वर्षाच्या इतिहासात विसर्गाचे यंदाचे २२ वे वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 7:05 PM

Jayakwadi Dam : स्थानिक पाणलोटक्षेत्रातील पावसावर धरण भरत असल्याने मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा असून  जायकवाडी आत्मनिर्भर होत असल्याचे हे संकेत आहेत.

ठळक मुद्दे१९७५ पासून विसर्ग...यंदाचे २२ वे वर्ष१९९० व २००६ ला पैठण शहरात पूर...

- संजय जाधवपैठण :  नाशिक जिल्ह्यातील धरण समूहावर भिस्त असलेल्या जायकवाडी धरणात ( Jayakwadi Dam ) २००९ ते १६ दरम्यान सलग आठ वर्ष  अपेक्षित जलसाठा न झाल्याने कपात करून पाणी वापरण्याची वेळ मराठवाड्यावर (Marathawada ) आली होती. परंतू गेल्या तीन वर्षापासून नाशिक पेक्षा स्थानिक पाणलोटक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने याच पावसावर जायकवाडी धरण मोठ्या प्रमाणावर भरल्याचे समोर आले आहे. बुधवारी जायकवाडी धरणातून विसर्ग करण्यात आला. सलगपणे तीन वर्ष धरणातून पाणी सोडण्याची धरणाच्या इतिहासातील ही तिसरी वेळ आहे. 

स्थानिक पाणलोटक्षेत्रातील पावसावर धरण भरत असल्याने मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा असून  जायकवाडी आत्मनिर्भर होत असल्याचे हे संकेत आहेत. धरणाच्या ४६ वर्षाच्या इतिहासात  पाणी सोडण्याचे हे २२ वे वर्ष आहे. जायकवाडी धरणाच्या इतिहासात सुरवातीच्या काळात १९७५ ते १९८१ असे सलग सात वर्ष धरणातून विसर्ग करावा लागला. दुसऱ्यांदा सन २००५ ते २००८ असा सलग चार वर्ष  विसर्ग झाला. यानंतर सन २०१९ ते २०२१ असा सलग तीन वर्ष विसर्ग होत आहे. 

१९७५ पासून विसर्ग...यंदाचे २२ वे वर्षजायकवाडी धरणाच्या दरवाज्यांचे काम बाकी असताना १९७५ मध्ये पैठण येथून ३९८५२ क्युसेक विसर्ग झाल्याची नोंद आहे. १९७६ ला धरणाचे २७ दरवाजे ८" उचलून प्रथमच १५०,००० क्युसेक असा विसर्ग करण्यात आला. १९७५ ते १९८१ असे सलग सात वर्ष  धरणातून विसर्ग करावा लागला. १९८२ ला विसर्ग करावा लागला नाही मात्र १९८३ ला ८०१९५ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात आला.  १९८४ ते १९८७ या चार वर्षात धरणात अपेक्षित जलसाठा न झाल्याने विसर्ग करावा लागला नाही. १९८८ ला नाममात्र विसर्ग करण्यात आला. पुन्हा १९८९ हे वर्ष कोरडे गेले. १९९० ला गोदावरीला महापूर आल्याने १८७६५२ क्युसेक अशा मोठ्या क्षमतेने विसर्ग करावा लागला. १९९१ लाही ५९४०८ क्युसेक क्षमतेने विसर्ग झाला. १९९२ ते १९९७ या सहा वर्षात १९९४ ला पाणी सोडावे लागले बाकीचे वर्षे कोरडेच राहिले. यानंतर १९९८ व ९९ सलग दोन वर्ष विसर्ग झाला. यानंतर सन २००० ते २००५ असे सलग चार वर्ष धरणातून पाणी सोडले नाही. मात्र २००५ ते २००८ या दरम्यान सलग चार वर्षे पाणी सोडावे लागले. यानंतर पुढील आठ वर्षे २००९ ते २०१६ मोठे बीकट गेले या दरम्यान अपेक्षित जलसाठा न झाल्याने पाणी जपून वापरावे लागले. पुन्हा २०१७ ला पाणी सोडावे लागले यानंतरचे २०१८ पुन्हा कोरडे गेले. यानंतर मात्र २०१९ ते २०२१ सलग तीन वर्षांपासून धरणातून विसर्ग होत आहे. 

२००० नंतर धरण  भरण्याचे प्रमाण घटले...सन २००० ते २०२१ या २२ वर्षाच्या काळात धरण ८ वेळेस भरले, दरम्यान  १४ वर्ष धरणातून पाणी सोडण्याचा प्रसंग आला नाही. २००० ते २००४ व २००९ ते २०१६ असे सलग व २०१८  या  १४  वर्षात  धरणातील जलसाठा काटकसरीने वापरावा लागला. मात्र या २१ वर्षात २००५ ते २००८ या दरम्यान धरणातून मोठ्या क्षमतेने पाणी सोडावे लागले.  २०१७ ला २७८४६ क्युसेक्स व २०१९ ला ५०३०४ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग केला गेला. २०२० ला तर धरणातून ८० टिएमसी पाणी सोडावे लागले.  यंदाची सुरवात ४७१६० क्युसेक्स क्षमतेने बुधवारी करण्यात आली आहे. 

१९९० व २००६ ला पैठण शहरात पूर...१९९० ला १२ ऑक्टोबर रोजी धरणातून १८७६५२ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात आला होता. पैठण शहराखालील बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच उघडण्यात अपयश आल्याने पैठण शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती.  २००६ ला धरणातून ऑगस्ट महिण्यात २,५०,६९५ असा मोठा विसर्ग करण्यात आल्याने सहा दिवस अर्धे पैठण शहर पाण्याखाली होते. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद