शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

हायकोर्टाच्या आदेशानंतर २३ हजार मीटर केबल केले कट; ३० टक्के इंटरनेट ग्राहकांची सेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 7:53 PM

इंटरनेटचा वापर करणारे शहरात १ लाखाहून अधिक ग्राहक आहेत.

औरंगाबाद : खंडपीठाच्या आदेशानुसार शहरातील केबल कट करण्याची माेहीम मनपाकडून अधिक तीव्र करण्यात आली. बुधवारी, दुसऱ्या दिवशी २३ हजार ३७० मीटर केबल कट करण्यात आली. त्यामुळे शहरातील जवळपास ३० टक्के ग्राहकांचे इंटरनेट, केबल टीव्ही बंद पडल्या. इंटरनेट सेवा देणाऱ्या ऑपरेटर्स मंडळींमध्ये खळबळ उडाली असून, मनपानेच पर्यायी व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

मंगळवारपासून मनपाने व्यापक प्रमाणात केबल काढण्याची मोहीम सुरू केली. अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अतिक्रमण हटाव पथक, विद्युत विभाग, वॉर्ड अधिकारी यांच्या पथकामार्फत शहरातील झोन क्र १, ४ व ७ मध्ये कारवाई करण्यात आली. दिवसभरात २३ हजार ३७० मीटर केबल काढण्यात आली. आठवडाभर ही मोहीम चालणार आहे. या मोहिमेनंतर अनधिकृत केबल टाकल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

या भागात केली कारवाईमहापालिकेच्या पथकाने सलीम अली सरोवर ते जैस्वाल हॉल, एम-२ ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा, हडको कॉर्नर ते जटवाडा रोड, उद्धवराव पाटील चौक ते अण्णाभाऊ साठे चौक, सेव्हन हिल ते सुतगिरणी चौक ते शहानूर मियाँ पदर्गा रोड, सावरकर चौक, गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर रोड, गोकुळ स्वीट ते शिवाजीनगर, घासमंडी, मंजुरपुरा, गांधी पुतळा, टाकसाळी टॉवर, जुना बाजार ते भडकल गेट या भागातील केबल काढली.

केबल, इंटरनेट बंदमनपाच्या कारवाईमुळे शहरातील हजारो टीव्ही कनेक्शन बंद झाले. त्याचप्रमाणे इंटरनेट ग्राहकांचीही मोठी गैरसोय झाली. हजारो नागरिकांना फटका बसला.

शहरात १ लाखांहून अधिक ग्राहकइंटरनेटचा वापर करणारे शहरात १ लाखाहून अधिक ग्राहक आहेत. मागील दोन दिवसांत ३० टक्के ग्राहकांची सेवा बंद झाली आहे. शहरात १५ मोठे ऑपरेटर्स आहेत. लहान-लहान ऑपरेटर्सची संख्या ५० ते ७५ पर्यंत आहे. आम्ही एकत्र येऊन या कारवाईसंदर्भात चर्चा करणार आहेत. मनपाने आम्हाला रस्त्याच्या कडेला एक ठरावीक जागा उपलब्ध करून द्यावी, नेहमीसाठी हा विषय संपेल.- आर.एस. छाबडा, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका