औरंगाबाद : शहरात महापालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९१ मध्ये वाढीव हद्दीसाठी विकास आराखडा मंजूर करण्यात आला. या आराखड्याला सुधारित करण्याचे काम तब्बल २३ वर्षांनंतर मनपा प्रशासनाने सुरू केले आहे. कागदावरच तयार होणाऱ्या या आराखड्याचा प्रत्यक्ष काहीच उपयोग होणार नाही, हे विशेष.महापालिका हद्दीत झोपडपट्ट्या तयार होऊ नयेत, शहर चांगले विविध सुविधांयुक्त असावे या दृष्टीने शहर विकास आराखडा राबविण्यात येतो. या आराखड्यानुसार नागरिकांना रस्ते, मैदान, रुग्णालये, शाळा आदी मूलभूत सोयी-सुविधा दिल्या जातात. १९८२ मध्ये औरंगाबादेत महापालिका स्थापन करण्यात आली. त्यानंतर मनपाची हद्दही वाढविण्यात आली. या वाढीव हद्दीत १८ गावांचा समावेश करण्यात आला. शिवाय सिडकोतील २०५ हेक्टरचाही समावेश केला.महापालिकेने १९९१ मध्ये वाढीव हद्दीसाठी विकास योजना मंजूर केली. आता या विकास आराखड्यानुसार प्रारूप विकास आराखडा तयार करण्याचे काम नगररचना विभागाचे सहसंचालक म.रा. खान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. २० मे २०११ पासून औरंगाबादेत महापालिकेने बन्सीलालनगर येथे नगररचना विभागाचे एक स्वतंत्र कार्यालय तयार केले आहे. या कार्यालयात मागील काही वर्षांपासून प्रारूप विकास आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. १ आॅगस्ट २०१४ रोजी तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडे प्रारूप विकास आराखड्याचे हस्तांतर करण्यात आले.
२३ वर्षांनंतर विकास आराखड्याचे काम
By admin | Published: September 24, 2014 12:45 AM