लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : मृग नक्षत्राला पंधरा दिवस उलटूून पेरणी योग्य पाऊस न झाल्याने तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. तालुक्यात केवळ २३.६६ टक्के पेरणी झाल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.पूर्णा तालुक्यात सोयाबीन, तूर, कापूस आदी पिकांसह उडीद, मूग, कापसाचीही लागवड केली जाते. खरीप पिकामध्ये सोयबीन पिकाचे उत्पन्न इतर पिकांपेक्षा जास्त होते. मृगनक्षत्राच्या आगमनासोबत पावसास सुरुवात झाली होती. परंतु, तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला नसल्याने चु्डावा, गौर, टाकळी आदी भागात काही ठिकाणी पेरण्या करण्यात आल्या. ताडकळस परिसरातील पेरण्या सुरू आहेत. तालुक्यात आतापर्यंत १४.०८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर कृषी विभागाच्या पेरणी अहवालानुसार सोयाबीन ८ हजार ९०० हेक्टर, तूर ३ हजार २०५ हेक्टर, कापूस १ हजार १५० हेक्टर, मूग ६५० तर उडीदाची २५० हेक्टवर पेरणी झाली आहे.
पूर्णा तालुक्यात २३.६६ टक्के पेरणी
By admin | Published: June 22, 2017 11:16 PM