लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : हदगाव तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असून मनुला ग्रामपंचायतचे सात सदस्य व सरपंच बिनविरोध निवडले असून गोर्लेगावचे सात सदस्य बिनविरोध निवडले असले तरी सरपंचपदासाठी मतदान होणार आहे. शिवाय माटाळा ५, वरवट २, व बेलमंडळचे ३ सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. तर बेलमंडळच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज नसल्यामुळे फक्त एका जागेसाठी दोघांत लढत होणार असल्याची माहिती तहसीलदार संदीप कुळकर्णी यांनी दिली. यावेळी नायब तहसीलदार उत्तम निलावाड उपस्थित होते.मनूला येथे ७, माटाळा ७, तालंग ९, वरवट ९, गोर्लेगाव ९ व बेलमंडळ ७ अशा सहा ग्रामपंचायतमधील ४८ सदस्य व सहा सरपंच थेट जनतेतून निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मनुला सरपंचपदासाठी १ व सदस्यांच्या ७ जागांसाठी १० अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील तिघांनी माघार घेतल्यामुळे सर्व ग्रामपंचायत बिनविरोध निवडली गेली. माटाळा सरपंचपदासाठी २ व सदस्यपदाच्या ७ जागांसाठी पाचच अर्ज आले. ते पाचही बिनविरोध निवडले गेले पण वॉर्ड क्रं. १ व ३ मधील प्रत्येकी एक एक जागेसाठी अर्ज प्राप्तच झाले नाहीत त्यामुळे दोन जागा रिक्त राहणार आहेत. तालंग येथे मात्र सरपंच पदासाठी ५ व सदस्यांच्या ९ जागांसाठी २० अर्ज प्राप्त झाले होते. सरपंचाचा १ व सदस्यांचे २ अर्ज परत घेतल्यामुळे एका सरपंचाच्या जागेसाठी ४ व ९ सदस्यपदासाठी १८ जण निवडणूक लढवत आहेत. वरवट येथील सरपंचपदासाठी ४ उमेदवार असून ९ पैकी वॉर्ड क्रं. ३ मधील ३ जागांसाठी एकही अर्ज आला नाही. त्यामुळे वॉर्ड १ व २ मधील ६ जागांपैकी २ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या तर उर्वरित ४ जागांसाठी ८ जण निवडणूक लढवत आहेत. तर सरपंचपदासाठी आलेल्या ४ अजार्तून एकाने माघार घेतल्यामुळे तिघांत निवडणूक होत आहे.गोर्लेगाव येथील ९ जागांसाठी ९ अर्ज आले होते पण वॉर्ड क्रं. २ मधील एका अनुसूचित जातीच्या उमेदवाराचे वय २१ पेक्षा कमी असल्यामुळे त्याचा अर्ज अवैध ठरला. तर उर्वरित ७ जण बिनविरोध निवडले गेले. तर वॉर्ड क्रं. ३ मधील (अ.जा. महिला) एका जागेसाठी अर्ज प्राप्त झाला नाही. सरपंचपदासाठी दोन अर्ज असल्यामुळे संपूर्ण गावात मतदान घेण्यात येणार आहे.बेलमंडळ येथील ओबीसी महिलासाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नाही. तर वॉर्ड क्रं. १ मधील १ व वॉर्ड क्रं. ३ मधील २ जागांसाठी अर्जच प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे सदस्यपदाच्या ४ जागांसाठी ६ अर्ज प्राप्त झाले होते त्यातील एकाने माघार घेतल्यामुळे ३ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या तर एका जागेसाठी दोघांत लढत होत आहे.निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी शुक्रवारी पहिले प्रशिक्षण पार पडले. यावेळी ४ केंद्राध्यक्ष व १५ मतदान अधिकारी गैरहजर होते़
हदगाव तालुक्यात २४ सदस्य बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:12 AM