बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहराच्या विस्तारीकरणासोबतच शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. असे असले तरी वर्षभराच्या कालावधीत शहरात तब्बल २४ जणांचे खून झाले आणि हाणामारीच्या शेकडो घटनांमध्ये ६१२ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत खून आणि हाणामारीच्या घटनांमध्ये घट झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला.याविषयी प्राप्त माहिती अशी की, शहराच्या तिन्ही बाजूने वाळूज, चिकलठाणा आणि रेल्वेस्टेशन या एमआयडीसी आहे. यासोबत शेंद्रा पंचतारांकित वसाहत आणि नव्याने येऊ घातलेला दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे शहराच्या लोकसंख्येत भर पडणार आहे. उद्योग-व्यवसायानिमित्त देश-विदेशातील लोक औरंगाबादेत येत असतात. औद्योगिकरणासोबतच शहरातील गुन्हेगारी मागील पाच वर्षांच्या तुलनेत वाढली आहे. असे असले तरी गतवर्षीच्या तुलनेत खून आणि हाणामारीसारख्या घटना घटल्याचा दावा शहर पोलिसांनी केला. कट रचून आणि सुपारी देऊन हत्या करण्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. पती सतत चारित्र्यावर संशय घेत असल्याने शासकीय पदावरील एका महिला अधिकाºयाने बँक अधिकारी असलेल्या पतीची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी शहरात घडली. अशा मोजक्या घटना सोडल्या, तर किरकोळ कारणावरून तब्बल २४ खून शहरात झाले.हाणामारीच्या घटना मात्र रोज घडत आहेत. वाहनाला कट का मारला, रागाने पाहणे, नळाच्या पाण्यावरून शेजाºयांतील भांडण, गुंडागर्दी करून हाणामारी होण्याचे प्रकार मात्र वाढले आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्यांत अकरा महिन्यांच्या कालावधीत हाणामारीच्या ५०० हून अधिक घटना घडल्या. या घटनांमध्ये ६१२ जण जखमी झाल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.याविषयी सूत्रांकडून समजले की, शहरात रोज सहा ते सात हाणामारीच्या घटना घडतात. या हाणामारीत जखमी झालेले उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात आणि तेथून पुढे तडजोडीला सुरुवात होते. प्रकरण पोलिसांत गेले तर कोर्ट-कचेरीच्या चकरा माराव्या लागतील, पुन्हा पोलीस रेकॉर्ड तयार होऊन तरुणांच्या नोकरीसाठी ते अडसर ठरू शकते, ही बाब लक्षात घेऊन प्रकरण आपसात तडजोडीने मिटविले जाते. बºयाचदा पोलीसही अशावेळी मदत करतात.
गतवर्षी हाणामारीत झाले तब्बल २४ खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:46 AM