औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी ४२९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ६४० रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. तर ३६ वर्षांखालील ५ रुग्णांसह औरंगाबाद जिल्ह्यातील २४ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच अन्य जिल्ह्यांतील ४ रुग्णांचाही मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ५ हजार ८८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४० हजार ३४ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख ३१ हजार ९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,०५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ४२९ नव्या रुग्णांत शहरातील १३६, तर ग्रामीण भागातील २९३ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील २३० आणि ग्रामीण भागातील ४१० अशा ६४० रुग्णांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यात काही दिवसांपासून रुग्णसंख्या घटत आहे; परंतु मृत्यूदर वाढत आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर गुरुवारी ५.५९ टक्के राहिला.
उपचार सुरू असताना शिरसगाव, गंगापूर येथील ६८ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ७५ वर्षीय महिला, करंजखेडा, कन्नड येथील ४५ वर्षीय पुरुष, गजानननगर येथील ७२ वर्षीय पुरुष, बजाजनगर येथील ७८ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ५७ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ५५ वर्षीय महिला, चिंचोली लिंबाजी, कन्नड येथील ४५ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ६५ वर्षीय महिला, अबरार काॅलनीतील ६८ वर्षीय पुरुष, बजाजनगरातील ६५ वर्षीय महिला, वैजापूर येथील ६६ वर्षीय पुरुष, मुकुंदवाडीतील ३० वर्षीय पुरुष, पोखरी, वैजापूर येथील ८५ वर्षीय पुरुष, पिशोर, कन्नड येथील ४६ वर्षीय महिला, पडेगाव येथील ४८ वर्षीय पुरुष, शहरातील ७८ वर्षीय महिला, एन-४ येथील ५५ वर्षीय पुरुष, शहापूर, गंगापूर येथील ३२ वर्षीय पुरुष, विरगाव, वैजापूर येथील ३५ वर्षीय महिला, वैजापूर येथील ३२ वर्षीय महिला, सुलतानपूर, खुलताबाद येथील ३६ वर्षीय पुरुष, डोणगाव, पैठण येथील ६७ वर्षीय पुरुष, भालगाव, वैजापूर येतील ६५ वर्षीय महिला आणि जालना जिल्ह्यातील ५५ वर्षीय पुरुष, ७१ वर्षीय पुरुष, अहमदनगर जिल्ह्यातील ५५ वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद ६, सातारा परिसर ६, बीड बायपास ७, रेल्वेस्टेशन १, ज्योतीनगर १, एन-५ येथे २, संसारनगर, क्रांती चौक १, नंदनवन कॉलनी २, कांचनवाडी १, एसआरपीएफ कॅम्प १, देवडा नगर १, देवळाई रोड १, अजित सीड २, पुंडलिकनगर १, उल्कानगरी २, रमानगर १, गणेशनगर १, जयभवानीनगर ३, कामगार चौक १, देवळाई चौक १, पैठण रोड १, जयभीमनगर, टाऊन हॉल १, गाडे चौक १, रंगारगल्ली २, पैठण गेट १, सारा वैभव १, वानखेडेनगर १, हर्सूल २, एन-१२ येथे १, एकतानगर १, एन-११ येथे २, टी.व्ही. सेंटर १, जाधववाडी २, एन-९ येथे ३, एन-७ येथे २, एन-८ येथे १, नॅशनल कॉलनी १, शाहगंज १, रोशन गेट १, भावसिंगपुरा २, जवाहर कॉलनी १, सुमेध रेसिडेन्सी सीबीएस रोड १, जयसिंगपुरा ३, रामनगर १, ब्रिजवाडी १, सिडको उड्डाणपूल परिसर १, घाटी २, मुकुंदवाडी १, एन-२ येथे १, अन्य ५३.
ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर ७, एमआयडीसी वाळूज २, साऊथ सिटी वाळूज महानगर-२ येथे १, रांजणगाव शेणपुंजी १, बकवालनगर, वाळूज १, वडगाव कोल्हाटी १, पिसादेवी १, प्रतापनगर १, शेंद्रा एमआयडीसी १, करमाड १, पळशी १, पिंप्रीराजा २, बाबरा १, माळीवाडा १, कानेगाव ता. फुलंब्री १, घाटशेंद्रा ता. कन्नड १, तेजगाव ता. खुल्ताबाद १, देवपोड ता. कन्नड १, अन्य २६७.
-----
आतापर्यंत १८ वर्षांखालील ९ हजार बाधित
शहरात आतापर्यंत १८ वर्षांखालील ९ हजार ७८ जण कोरोनाबाधित आढळले. यात शून्य ते ५ वर्षांपर्यंतच्या एक हजार ३७२ बालकांचा समावेश आहे. तर ५ वर्षे ते १८ वर्षांखालील ७ हजार ७०६ जणांना कोरोनाची लागण झाली. काही दिवसांपासून बालकांना कोरोनाची बाधा होत असल्याविषयी चिंता व्यक्त होत आहे. शहरात शनिवारी ५ वर्षांखालील एक बालक कोरोनाबाधित आढळले.