लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नगर परिषदेच्या निवडणुकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र आ.तान्हाजी मुटकुळे यांना दिले आहे.हिंगोलीच्या नगराध्यक्षपदी भाजपचे बाबाराव बांगर यांना निवडून दिल्यास २५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे त्यांनी जाहीर सभेत सांगितले होते. ते निवडून आल्यानंतर लगेच त्याची घोषणा केली जाईल, असेही ते म्हणाले होते. मात्र त्याचा काही पत्ताच नसल्याने शहरात तर्कवितर्क लढविले जात होते. हे आश्वासन पोकळच ठरणार असल्याची शक्यताही वर्तविली जात होती.याबाबत आ.तान्हाजी मुटकुळे यांनाही वारंवार विचारणा केली जात होती. तर आ.मुटकुळे हेही त्यासाठी पाठपुरावा करीत होते. मात्र त्यासाठी योग्य प्रस्ताव तयार करून दिल्याशिवाय निधी देण्याची अडचण होती. नगराध्यक्ष बाबाराव बांगर, सीओ रामदास पाटील यांनी विकास आराखडा तयार करून दिला. जिल्हाधिकाºयांनी शिफारस केली. त्यानंतर या निधीचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांमध्ये हिंगोलीला २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र मुनगंटीवार यांनी आ.मुटकुळे यांना दिले आहे. त्याचे मुटकुळे, बांगर यांच्यासह नगरसेवक गणेश बांगर, अनिता उमेश गुठ्ठे, नीता बांगर आदींनी स्वागत केले.
हिंगोली शहरासाठी २५ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 12:00 AM