लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एसटी महामंडळातील कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपाने एकट्या औरंगाबाद विभागाला चार दिवसांत तब्बल अडीच कोटींचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील आठ बसस्थानकांतून ५०० पैकी एकही बस रस्त्यावर धावली नाही. त्यामुळे ‘एसटी’चे उत्पन्न बुडाले.एसटी महामंडळाची मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकासह जिल्ह्यात वैजापूर, कन्नड, पैठण, सिल्लोड, गंगापूर आणि सोयगाव ही प्रमुख बसस्थानके आहेत. या आठ बसस्थानकांतून ५०० बसेसच्या जोरावर दररोज विविध मार्गांवर जवळपास दोन हजार फे-या होतात. शिवाय या बसेस दररोज १ लाख ९० कि.मी. धावतात. दीड लाख प्रवासी दररोज एसटीतून प्रवास करतात. यातून औरंगाबाद विभागाला दररोज सुमारे ६० लाखांचे उत्पन्न मिळते.विविध मागण्यांसाठी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपाने चार दिवसांच्या उत्पन्नावर पाणी फेरले गेले.चार दिवस बसेस बसस्थानकातच उभ्या होत्या. दिवाळीत प्रवाशांची अधिक गर्दी असते. त्यामुळे एसटी महामंडळाला उत्पन्न देणारा हा कालावधी असतो; परंतु यंदा केवळ परतीच्या प्रवाशांच्या वाहतुकीतून महामंडळाला उत्पन्न मिळणार आहे.परतीच्या प्रवाशांची सुविधाऔरंगाबाद विभागाला दररोज ६० लाखांचे उत्पन्न मिळते. संपामुळे चार दिवसांच्या उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. दिवाळीनंतर परतीचा प्रवास करणाºया प्रवाशांच्या सुविधेचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र पाटील यांनी दिली.
चार दिवसांत अडीच कोटी रुपयांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 1:15 AM