लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेतील अधिकारी व पदाधिका-यांनी दोनदा चीन दौरा केला. मुंबईचा दौरा केला. त्यातून काहीच साध्य झाले नाही. आता महापालिकेतील तब्बल २५ महिला नगरसेविका इंदूर शहर पाहण्यासाठी गेल्या आहेत. १६ आॅगस्टला शहरातील कचराकोंडीला सहा महिने पूर्ण होत आहेत, हे विशेष.औरंगाबादकरांनी महापालिकेत पाठविलेल्या महिला लोकप्रतिनिधींनीही इंदूर बघण्याची इच्छा व्यक्त केली. महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी महिला नगरसेविकांचा दौरा आयोजित केला. २५ महिला नगरसेविका रविवारी रात्री बसने इंदूरला रवाना झाल्या.देशात, विदेशातही दौरेयापूर्वीही महापालिकेतील अधिकारी, पदाधिका-यांनी दोन वेळेस चीन, मुंबई, हैदराबाद, इंदूर या ठिकाणी दौरे करून तिथला कचरा नियोजनाचा अभ्यास केला होता. त्यानंतर आता पुन्हा नगरसेविका या दौ-यावर निघाल्या आहेत. यापूर्वीच्या दौºयानंतर औरंगाबादेत काहीही अंमलबजावणी झाली नाही.
महापालिकेच्या २५ नगरसेविका इंदूर दौैऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:35 AM