शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

विद्यापीठात ७३ जागांच्या भरती अर्जातून मिळाले २५ लाख, एका जागेसाठी ८० जण स्पर्धेत

By राम शिनगारे | Updated: September 19, 2023 19:52 IST

तब्बल ५ हजार ८१५ जणांचे प्राध्यापक होण्याचे स्वप्न

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ७३ प्राध्यापकांच्या भरतीसाठी अर्ज मागवले होते. अर्ज दाखल करण्याच्या २१ दिवसांच्या मुदतीत तब्बल ५८१५ जणांनी शुल्कासह ऑनलाइन अर्ज केले. अर्जाच्या शुल्कातून विद्यापीठाला तब्बल २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. या आकडेवारीवरून पात्रताधारक बेरोजगारांची भयंकर स्थिती दिसते.

विद्यापीठात विविध विभागांमध्ये २८९ प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत. त्यातील तब्बल १५० पदे रिक्त असून, शासनाने त्यातील ७३ पदांच्या भरतीसाठी मंजुरी दिली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने ७३ जागांच्या भरतीसाठी २३ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान ऑनलाइन अर्ज मागविले. अर्जाच्या शेवटपर्यंत तब्बल ५८१५ जणांनी शुल्क भरून ऑनलाइन अर्ज केले. त्यात खुल्या प्रवर्गासाठी ५००, आरक्षितसाठी ३०० रुपयांचे शुल्क ठेवले होते. या शुल्कापोटी विद्यापीठाकडे २५ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली. एका जागेसाठी तब्बल ७९.७ एवढे पात्रताधारक स्पर्धेत असल्याचेही आकडेवारीतून दिसते.

पदनिहाय अर्जविद्यापीठात ७३ जागांसाठी अर्ज मागविले. ३ जागा प्रोफेसर, २० असोसिएट प्रोफेसर आणि ५० असिस्टंट प्रोफेसर पदांच्या होत्या. त्यात प्रोफेसर पदासाठी १११, असोसिएटसाठी ७९५ आणि असिस्टंटसाठी तब्बल ४९०९ पात्रताधारकांनी अर्ज केले. तिन्हींची मिळून संख्या ५८१५ इतकी आहे.

विज्ञान विषयात सर्वाधिक अर्जअसिस्टंट प्रोफेसरच्या केमिस्ट्री विषयातील जागांसाठी तब्बल ४५२ जणांनी अर्ज केले. त्याशिवाय फिजिक्स ३९३, बॉटनी ४४३, झुऑलॉजी ३४६, गणित २५५, बायोटेक्नॉलॉजी २३०, केमिकल टेक्नॉलॉजीत १७४ जणांनी अर्ज केले. त्याशिवाय मराठी ३६२, हिंदी १६६, इंग्रजी ३७२, अर्थशास्त्र २३१, राज्यशास्त्र २७२, समाजशास्त्र २०३, पत्रकारिता १२०, कॉमर्स विषयासाठी १६७ जणांनी अर्ज केले आहेत.

प्रचंड बेरोजगारी असताना भरतीला विरोधप्राध्यापक होण्यासाठी पात्रताधारक बेरोजगारांच्या आकडेवारीने उच्चांक गाठला आहे. एका जागेसाठी तब्बल ८० जण रांगेत आहेत. अशी स्थिती असताना विद्यापीठातील संभाव्य भरतीला सत्ताधारी भाजप संबंधित विद्यापीठ विकास मंचने विरोध केलेला आहे. त्यासाठी उच्च शिक्षण प्रभारी संचालकांमार्फत चौकशी समितीही नेमली आहे. या विरोधाला पात्रताधारकांनी अर्ज भरून प्रतिसाद देत चपराक दिल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे.

पुढील प्रक्रिया होईलकुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनात पारदर्शकपणे प्राध्यापक भरतीची प्रक्रिया होत आहे. हार्डकॉपी दाखल करण्यासाठी २१ सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.-डॉ. भगवान साखळे, कुलसचिव

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र