बीड : जिल्हयातील ७४ जागांसाठी महसूल विभागाअंतर्गत रविवारी परीक्षा घेण्यात आली. २५ हजार २३४ उमेदवारांनी तलाठ्याची परीक्षा दिली. एकूण ३७ हजार १२३ उमेदवारांनी अर्ज भरले होते. मागील पंधरा दिवसापासून महसूल विभागा अंतर्गत तलाठी परिक्षेची तयारी सुरू होती. जिल्हयातील तलाठी या पदाच्या ७४ जागांसाठी परीक्षा पार पडली. ७४ जागांसाठी ३७ हजार १२३ उमेदवारांनी अर्ज केले होते. सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत जिल्हयातील ९४ केंद्रावरून परीक्षा घेण्यात आली. ११ हजार ८९० उमेदवारांची परिक्षेला अनुपस्थिती असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हयातील ९ तालुक्यात परिक्षा केंद्र देण्यात आले होते. यामध्ये बीड, वडवणी, माजलगाव, आष्टी, पाटोदा, अंबाजोगाई, परळी, केज व गेवराई या तालुक्यांचा समावेश होता. सकाळी ६ वाजल्या पासूनच उमेदवारांची परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी लगबग होती. तीन हजार पोलिसांचा फौजफाटा ज्या-ज्या ठिकाणी तलाठी परीक्षा केंद्र होते. त्या-त्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हयातील ९४ केंद्रावर ३ हजार ८० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)
२५ हजार परीक्षार्थी
By admin | Published: September 14, 2015 12:28 AM