शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

मराठवाड्यातील २५०० कुटुंबांचे स्थलांतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 6:07 AM

पावसाळ्यातील दोन महिने कोरडे गेल्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग गडद झाले

संजय जाधव।औरंगाबाद : पावसाळ्यातील दोन महिने कोरडे गेल्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग गडद झाले असून पैठण तालुक्यातून जवळपास २५०० कुटुंबांनी रोजी-रोटीच्या शोधात महानगरांकडे स्थलांतर केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.औरंगाबादसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत केवळ ३८ टक्के पाऊस झाला. पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सलग चाळीस दिवस पावसाचा थेंबही पडलेला नाही. हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असल्याने शेतकºयांची आशा ओलावली आहे.पैठण तालुक्यातील गेवराई (मर्दा) येथील २५ तरुण कामधंद्यासाठी बाहेर पडले असून, यंदा ४० टक्के गावकºयांना ऊसतोडीसाठी जावे लागणार असल्याचे येथील उपसरपंच महंमद पठाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खादगावमधून५० तरुणांनी, तर कडेठाण गावातील८० तरुणांनी मजुरीसाठी गाव सोडलेआहे. आडूळमधील २५० तरुणांनी स्थलांतर केले असून, ३०० महिला रोजंदारी कामासाठी शेंद्रा एमआयडीसी येथे जात असल्याची माहिती सरपंच श्रीपाल राठोड यांनी दिली.>साडेसात महिन्यांत५८० शेतकरी आत्महत्यामराठवाड्यात दुष्काळाचे सावट किती गडद झाले आहे, हे आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या आकडेवारीवरून दिसून येते. १ जानेवारी ते १३ आॅगस्टपर्यंत मराठवाड्यात ५८० शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले असून सर्वाधिक ११५ आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत.औरंगाबाद जिल्ह्यात७९, जालना ५३, परभणी ७३, हिंगोली ३३, लातूर ५६ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ७८शेतकºयांनी स्वत:ला संपविले. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे५८० जणांनी आपली जीवनयात्रा संपविली असली तरी प्रशासनाने नियमाच्या कसोटीत४०० प्रकरणेच पात्र ठरविली आहेत.>पैठण तालुक्यातील हर्षी गावातून २३ जोडपी चाकण येथील औद्योगिक वसाहतीत काम शोधण्यासाठी गेले आहेत. तांडा बुदु्रकमधून १० जोडपी नगर येथील कुक्कुटपालन उद्योग,तर १५ जण चितेगाव येथे गेल्याचे सरपंच ज्ञानेश्वर चाबुकस्वार यांनी सांगितले.दावरवाडीतून ५० तर नांदरातून ३० जोडप्यांनी गाव सोडले आहे. स्थलांतराची ही आकडेवारी एकट्या पैठण तालुक्यातील आहे.अशीच परिस्थिती जालना, बीड, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यात आहे. बीडमधून दरवर्षी ऊसतोड मजुरांचे हंगामी स्थलांतर होते. मात्र, यंदा हंगामापूर्वीच स्थलांतर सुरु झाले.> ऐन पावसाळ्यात जलसाठे कोरडेमराठवाड्यातील ७९ मध्यम प्रकल्पात केवळ ४०.०३ टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा असून जायकवाडीत ५० टक्के तर माजलगाव धरणात ६ टक्के इतकेच पाणी उपलब्ध आहे. गतवर्षीच्या उन्हाळ्यात लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते. यंदाही तीच वेळ येऊ शकते. जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धरणनिहाय उपयुक्त जलसाठा असा...