शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

‘जलसंधारण’च्या कामात २५.८२ कोटींचा भ्रष्टाचार; नकाशांचे डिजिटलायझेशन, कागदोपत्री दाखविले काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 1:32 PM

मराठवाड्यात ३ जिल्ह्यांत पथदर्शी प्रकल्प म्हणून जलसंधारण योजनांच्या नकाशांचे डिजिटलायझेनचे काम हाती घेण्यात आले होते.

छत्रपती संभाजीनगर : मृद व जलसंधारण विभागाकडून मराठवाड्यात प्रायोगिक तत्त्वावर बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील योजनांच्या नकाशांचे डिजिटलायझेशन करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु, हे काम कागदोपत्री झाल्याचे दाखवून सुमारे २५.८२ कोटी रुपयांची देयके काढली गेल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व कामांची चौकशी करून संबंधिताकडून ही रक्कम वसूल करावी, अशी मागणी बेरोजगार अभियंत्यांनी केली आहे. मराठवाड्यात ३ जिल्ह्यांत पथदर्शी प्रकल्प म्हणून जलसंधारण योजनांच्या नकाशांचे डिजिटलायझेनचे काम हाती घेण्यात आले होते. यामध्ये २०१७पूर्वी व नंतरच्या कामांची माहिती डिजिटल स्वरुपात एकत्रित करणे, ‘माथा ते पायथा’नुसार कामांची माहिती  उपलब्ध करून देणे, पाण्याचा ताळेबंद तयार करणे आणि सर्व योजनांची ऑनलाइन जिओ टॅग माहिती संकलित करण्यात येणार होती. 

मोफत कामासाठीमोजले पैसे! - वास्तविक टोपोशीट Soft Copy मध्ये Survey of I- dia च्या वेबसाइटवर अगदी मोफत उपलब्ध असताना, एका टोपोशीटसाठी रुपये तीस हजार रुपये खर्च दाखविण्यात आला आहे.- नकाशावर अस्तित्वातील योजना, प्रगतिपथावरील योजना, पूर्ण झालेल्या योजना, याचे कुठलेच मार्किंग केलेले नाही.- सदरील नकाशे भूमी अभिलेख विभागाकडे अगदी नाममात्र शुल्कामध्ये उपलब्ध आहेत. ते नकाशे आणून ते जशास तसे छापून काम केल्याचे दाखवले आहे. 

अधीक्षक अभियंता काय म्हणाले?जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता पी. परांडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कॉल केला असता, त्यांनी मी येथे नुकताच रूजू झालो आहे. यामुळे याविषयी मला आता काही सांगता येणार नाही. उद्या कार्यालयात या आपण यावर बोलू, असे म्हणून त्यांनी फोन कट केला.

ई-टेंडर का काढले नाही? सरकारचा एवढा मोठा पथदर्शी प्रकल्प असताना या कामाची ई-निविदा काढण्यात आली नाही.  ई-टेंडर प्रणालीचा अवलंब न करता सदरील कामाचे तुकडे पाडण्यात आले.

दरपत्रकाची मर्यादा रुपये ०.५० लक्ष असताना ३.०० लक्ष किमतीचे दरपत्रक काढण्यात आले. शिवाय, सदरील काम केल्याचे फक्त बिल सादर करून कोट्यवधी रुपये उचलण्यात आले.

वास्तविक, या कामास शासनाकडून प्रशासकीय मान्यता घेणे अनिवार्य होते. अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मान्यता न घेता हे काम कागदोपत्री दाखविण्यात आल्याने मोजमाप पुस्तिकांमध्ये सर्व गावांच्या नकाशांची मापे सारखीच घेतली गेली. 

बीडमध्ये हे काम एका झेरॉक्स चालकास, तर इतर ठिकाणी स्टेशनरी दुकानदार आदींना देण्यात आले. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार