औरंगाबाद : आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात ८ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान राबविण्यात आलेल्या कर्करोग शोधमोहिमेत ४ हजार लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २६ जण कर्करोग संशयित आढळून आले. जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे त्यांची पुढील तपासणी केली जात आहे.कर्करोगाचे निदान लवकरात लवकर झाल्यास रुग्णावर तात्काळ उपचार करून आजारापासून मुक्त करणे शक्य होते. त्यामुळे कर्करोगाची तपासणी महत्त्वाची ठरते. त्यामुळे राज्यात एक महिन्यासाठी कर्करोग शोधमोहीम राबविण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालयात ८ मार्च रोजी आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक डॉ. अनुपकुमार यादव यांच्या हस्ते या मोहिमेचे उद््घाटन झाले. ही मोहीम ७ एप्रिलपर्यंत राबविण्यात आली. यामध्ये ३० वर्षांवरील महिला-पुरुषांची तपासणी करण्यात आली.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलक र्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. पुष्कर दहीवाल, डॉ. लड्डा, डॉ. अमोल काकड, डॉ. अपर्णा रंजळकर, डॉ. विजया सोनवणे, डॉ. संजय चव्हाण, डॉ. पूजा झंवर, डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. सविता सोनवणे, डॉ. स्वप्नील गुट्टे, डॉ. वैशाली जाधव, डॉ. सुमित माने, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ. दीपाली कुलकर्णी, अधिपरिचारिका उषा बारगळ, विजश्री कोंडेवार, अनिता वैद्य आदींनी रुग्णांच्या तपासणीसाठी परिश्रम घेतले.१४ महिलांचा समावेशजिल्हाभरात महिला व पुरुषांची कर्करोगासह मधुमेह व उच्चरक्तदाब तपासणी करण्यात आली. यामध्ये २ हजार ७५३ महिला आणि १ हजार ९९६ पुरुषांची तपासणी करण्यात आली. जिल्हाभरात १४ महिला आणि १२ पुरुष, असे २६ रुग्ण कर्क रोगाचे संशयित असल्याचे आढळले. तोंडाच्या तपासणीत ५९ जणांत पांढरा, ३ जणांत लाल चट्टा आढळला. या सर्व रुग्णांची पुढील तपासणी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात आढळले २६ कर्करोग संशयीत रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:10 AM
आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात ८ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान राबविण्यात आलेल्या कर्करोग शोधमोहिमेत ४ हजार लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २६ जण कर्करोग संशयित आढळून आले. जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे त्यांची पुढील तपासणी केली जात आहे.
ठळक मुद्देकर्करोग शोधमोहीम : जिल्ह्यात ८ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान ४ हजार लोकांची तपासणी