लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत २७ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे़ त्यासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७४ वैध उमेदवारापैकी ४८ जणांनी माघार घेतली़ त्यातून १८ जणांची बिनविरोध निवड झाली़ १७ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत़यामध्ये नगरपंचायत हा एकमेव मतदारसंघ बिनविरोध निघाला आहे़ जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक प्रक्रियेत मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती़ ही निवडणूक बिनविरोध होणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, परंतु वाटाघाटी न झाल्याने व राष्ट्रवादीतील गटबाजी, सेना, भाजपाची एकमेकांवर कुरघोडी यामुळे तीन मतदारसंघात १७ जागांसाठी मतदान घ्यावे लागणार आहे़ यात सर्वात मोठा जिल्हा परिषद मतदारसंघ असून त्यात एकूण २८ उमेदवार निवडून द्यायचे आहेत़ यामध्ये ७ प्रवर्ग असून अनुसूचित जातीसाठी ६ जागा आहेत़ त्यात ३ पुरुष, ३ महिलांचा समावेश आहे़ पुरुष प्रवर्गातून ५ जणांची उमेदवारी छाननीअंती राहिले आहेत़ त्यापैकी दोघांनी माघार घेतली़तिन्ही जागा बिनविरोध निघाल्या़ अनुसूचित महिला जागा ३ वैध उमेदवार ४, एकाने माघार घेतल्यामुळे ३ जागांसाठी ३ उमेदवार आहेत़ अनुसूचित जमातीसाठी जागा १, वैध उमेदवार ३, दोघांची माघार त्यामुळे बिनविरोध, नागरिकांचा मागास प्रवर्ग ४ जागा, ७ उमेदवार, ३ जणांची माघार त्यामुळे बिनविरोध, नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग जागा ५, उमेदवार ८, माघार १, ७ रिंगणात, सर्वसाधारण जागा ६, उमेदवार १०, माघार ३, रिंगणात ६, सर्वसाधारण महिला जागा ६, उमेदवार ९, ३ जणांनी माघार घेतल्याने बिनविरोध निवड़ जिल्हा परिषद मतदारसंघात ५ प्रवर्गात १७ जागा, दोन प्रवर्गात मतदान, नगरपालिका मतदार संघात ४ प्रवर्ग, एकूण जागा ४, उमेदवार रिंगणात ८ असल्यामुळे मतदान होणार आहे़ नगर पंचायत मतदारसंघात १ जागा, २ उमेदवार, १ माघार त्यामुळे बिनविरोध़ एकंदरीत ७४ पैकी ४८ उमेदवारांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी मागे घेतली़ त्यामुळे १८ जागा बिनविरोध निघाल्या असून १७ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत़
१७ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:44 AM