औरंगाबाद : मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा गांजण्याची शक्यता आहे. विभागातील चार जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून मोठ्या, मध्यम व लघु, अशा ८६७ प्रकल्पांत २६.९० टक्के उपयुक्त जलसाठा आहे. ३१६ पर्यंत टँकरचा आकडा गेला असून, ५९५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. २५५ गावांमध्ये पाणीटंचाई आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात २५५ गावांत २१६ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, प्रशासनाने ५९५ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. जिल्हानिहाय टंचाई आराखड्याचे आदेश विभागीय पातळीवरून देण्यात आले आहेत. टंचाई आराखडा लवकरच अंतिम होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. १९० गावांत २३१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
यंदा शेती व इतर उपयोगासाठी जायकवाडीतून ८ आवर्तने देणे सध्या शक्य आहे. तिसऱ्या आवर्तनाचा अंतिम टप्पा संपत आला आहे. बंधाºयांची दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना विभागीय प्रशासनाने केल्या आहेत. विभागातील औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस झाला. त्यामुळे या उन्हाळ्यात विभागातील सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाईची शक्यता निर्माण होऊ शकते. टंचाई आराखड्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाला प्रशासकीय पातळीवरून सूचना दिल्या आहेत.
८६७ प्रकल्पांत २६ टक्के पाणीविभागात ११ मोठे प्रकल्प आहेत. त्यामध्ये ३०.५५ टक्केजलसाठा आहे. ७५ मध्यम प्रकल्प असून, त्यामध्ये २६.२९ टक्के, ७४६ लघु प्रकल्पांत १५.६२ टक्के, तर ३५ बंधाºयांमध्ये ४४ टक्के जलसाठा आहे. एकूण ८६७ प्रकल्पांत २६.९० टके जलसाठा आहे. मोठ्या प्रकल्पांतील ४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यातील तीन प्रकल्प नांदेड, तर १ प्रकल्प परभणी जिल्ह्यातील आहे. औरंगाबादमधील जायकवाडीत ७५ टक्के पाणी आहे. २५ ते ५० टक्क्यांदरम्यान पाणीसाठा हिंगोलीतील एका प्रकल्पात आहे. उस्मानाबादमधील दोन आणि परभणीतील एका मोठ्या प्रकल्पात ५० ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. बीडमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.
टँकरची सद्य:स्थिती अशीजिल्हा गावे टँकरऔरंगाबाद १९० २३१जालना ३५ ४४परभणी ०७ ०९हिंगोली ०२ ०२नांदेड २१ ३०बीड ०० ००लातूर ०० ००उस्मानाबाद ०० ००एकूण २५५ ३१६