शहरं
Join us  
Trending Stories
1
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
2
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
3
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
4
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
5
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
7
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
8
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
9
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
10
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
11
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
12
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
13
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
14
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
15
IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा
16
वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...
17
MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?
18
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
19
"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
20
भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट

हिरडपुरी बंधाऱ्यातून २६७६१ क्युसेस विसर्ग; अनेक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 6:54 PM

मंगळवारी सकाळपासून बालानगर, विहामांडवा, आडूळ, पाचोड, नांदर, दावरवाडी, परिसरास पावसाने झोडपून काढले.

ठळक मुद्देपैठण तालुक्यात जोरदार पाऊस गोदावरी काठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पैठण : तालुक्यास पावसाने झोडपून काढले असून वीरभ्रदासह इतर नद्यांना पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विरभद्रा नदीला आलेल्या पुरामुळे आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्याचे दरवाजे उघडून गोदावरी पात्रात २६७६१ क्युसेस क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे गोदावरीला नदीला पुर आला असून नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून  सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पैठण तालुक्यात  हलक्या ते मध्यम पावसास सोमवारी रात्री पासून सुरवात झाली. दरम्यान, मंगळवारी सकाळपासून बालानगर, विहामांडवा, आडूळ, पाचोड, नांदर, दावरवाडी, परिसरास पावसाने झोडपून काढले. पुर आल्याने या भागातील नदीनाले एक झाले. तालुक्यातील प्रमुख नदी असलेल्या वीरभ्रदा नदीला महापूर आल्याने विविध ठिकाणचे पुल पाण्याखाली गेले, अनेक गावांचा संपर्क तुटला. नांदर येथील पुलावरून पाणी वहात असल्याने नांदरचा संपर्क मंगळवारी सकाळपासून तुटलेला आहे. हार्षी येथील नदीला पुर आल्याने हार्षी व सोनवाडीचा संपर्क तुटला याच प्रमाणे कुतुबखेडा नदीला पुर आल्याने या गावाचाही संपर्क तुटलेला आहे.

हिरडपुरी बंधाऱ्यातून मोठा विसर्ग..... नद्या नाल्यांना पुर आल्याने गोदावरी पात्रातील आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यातून आज सकाळी विसर्ग करण्यात आला. हिरडपुरी बंधारा १००% भरत आल्याने सकाळी ८.३० वा. बंधाऱ्याचे चार दरवाजे वर उचलून दरवाजातून २६७६१ क्युसेक्स ईतक्या मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात आला या मुळे हिरडपुरी खालील गोदावरी नदीस महापूर आला आहे. दरम्यान आपेगाव बंधारा दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान १००% भरल्याने या बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडून १४४५० क्युसेक्स क्षमतेने गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आल्याचे अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. 

मराठवाड्यात पावसाचे दमदार पुनरागमन; ६७ मंडळात अतिवृष्टीची नोंद, अनेक गावांचा संपर्क तुटला

नागरिकांना सावधानतेचा इशारा.... हिरडपुरी व आपेगाव बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला पुर आला असून नदी काठच्या गावांना सावधानतेचा ईशारा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिला आहे. गोदाकाठच्या गावात तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल यांना गावात राहण्या बाबत सूचना तहसील प्रशासनाने दिल्या आहेत. 

जायकवाडी धरणात २४१३ क्युसेस आवक...... जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे २४१३ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी धरणाचा जलसाठा ४२.२९% झाला होता. धरणाच्या स्थानिक पाणलोटक्षेत्रात पाऊस सुरू असून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव व नेवासा तालुक्यातून सध्या मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. गेल्या २४ तासात ६ दलघमी जलसाठ्यात वाढ झाली असून १ जून पासून धरणात ३३० दलघमी (११.६५ टिएमसी) ची वाढ झाली आहे. सध्या धरणात १६५६.१६२ (५८.४८ टिएमसी) एकूण जलसाठा असून उपयुक्त जलसाठा ९१८.०५६ दलघमी (३२.४१ टिएमसी) ईतका आहे. नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने तेथून अद्याप अपेक्षित आवक झालेली नाही. सध्या नाशिक जिल्ह्यातील येणारे पाणी बंद आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद