शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

जुगार खेळणारे २७ जण जेरबंद

By admin | Published: February 17, 2015 12:09 AM

जालना : शहरातील बसस्थानकाजवळ मंमादेवी लॉजच्या गच्चीवर चालणाऱ्या टोकन जुगार अड्डयावर सोमवारी सायंकाळी छापा मारून पोलिसांनी २ लाखांचे टोकन, रोख ७५ हजार रुपये, ३१ मोबाईल व ६ दुचाकी जप्त केल्या.

जालना : शहरातील बसस्थानकाजवळ मंमादेवी लॉजच्या गच्चीवर चालणाऱ्या टोकन जुगार अड्डयावर सोमवारी सायंकाळी छापा मारून पोलिसांनी २ लाखांचे टोकन, रोख ७५ हजार रुपये, ३१ मोबाईल व ६ दुचाकी जप्त केल्या. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.मध्यवस्तीत बसस्थानकाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून लॉजच्या गच्चीवर जुगाराचा क्लब चालत असल्याची माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी दीक्षितकुमार गेडाम यांना मिळाली. सदर बाजार पोलिसांसह गेडाम यांनी या ठिकाणी छापा मारला. त्यावेळी टोकन घेऊन पत्त्यांचा जुगार सुरू होता. पोलिस आल्याचे कळताच काही जणांनी पळण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी लॉजच्या परिसरात चोहोबाजुंनी सापळा रचल्याने एकाही आरोपीला पळ काढता आला नाही. या छाप्यात २७ आरोपींना पोलिसांनी अटक केली. रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते. या कारवाईमुळे बसस्थानक परिसरात खळबळ उडाली आहे. कारवाईच्या वेळी परिसरातील बघ्यांनी गर्दी केली होती. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी गेडाम म्हणाले, टोकन जुगार मुंबईसारख्या शहरांमध्ये चालतो. तसाच जुगार या ठिकाणी सुरू होता. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह व अपर अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनखाली आम्ही हा छापा मारून कारवाई केली. शहरात आणखी कोठे या प्रकारचा जुगार सुरू आहे का, याची चौकशी सुरू असल्याचे गेडाम यांनी सांगितले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये काही प्रतिष्ठितांचाही समावेश असल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र रात्री उशिरापर्यंत नावे उपलब्ध होऊ शकली नाहीत. (प्रतिनिधी)सोमवारी सायंकाळी पोलिसांची चार वाहने बसस्थानक परिसरात अचानक दाखल झाली. त्यानंतर कारवाई सुरू असताना बघ्यांनी लॉजसमोर गर्दी केली. तेथे दुचाकी वाहनांच्या पार्किंगजवळच जमाव जमला होता. तो पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे काहीजण वाहनांवर आदळून किरकोळ जखमी झाले.