येणेगूर : रबी पीक विमा योजनेंतर्गत येणेगूर शाखेत २ हजार ७८७ शेतकऱ्यांनी ११ लाख ७१ हजार २४८ रुपये ९२ पैसे इतका विक्रमी विमा भरला आहे. या शाखेंतर्गत येळी, येणेगूर, दाळींब, नळवाडी, महालिंगरायवाडी, आष्टाकासार, भोसगा, दस्तापूर, तुगाव, कोळनूर पांढरी, सुपतगाव या १२ गावातील शेतकऱ्यांनी या योजनेस मोठा प्रतिसाद दिला. विमा रक्कम भरुन घेण्यासाठी शाखा व्यवस्थापक विठ्ठल औरादे, तपासनिस देविदास शिंदे, विठ्ठल नाईक, रोखपाल देविनंदा नरवटे, नरहरी बारसे यांनी परिश्रम घेतले. जेवळी शाखेत २६१ शेतकऱ्यांनी १ लाख ५० हजार ९९१ रुपये ७६ पैसे इतकी रक्कम भरुन रबी पीक विमा संरक्षित केला. शाखाधिकारी भास्कर, रोखपाल संभाजी जाधव यांनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे आंबा फळबाग व विम्यासाठी तालुक्यातील आंबा बागायतदारांनी अल्पसा प्रतिसाद दिला. त्यामध्ये दाळींब येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखेत पाच शेतकऱ्यांनी तर मुरुम येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखेत तीन आंबा बागायतदार असे एकूण आठच शेतकऱ्यांनी आपल्या आंबा बागांचा विमा उतरविल्याचे दाळींब शाखेचे व्यवस्थापक बसंतकुमार तर मुरुम शाखेचे व्यवस्थापक गोपलानी यांनी सांगितले. (वार्ताहर)
२७८७ शेतकऱ्यांनी भरला पीक विमा
By admin | Published: January 01, 2015 12:21 AM