औरंगाबाद : जिल्ह्यात २८ कोरोनाबाधित रुग्णांची शुक्रवारी भर पडली. तर ग्रामीण भागातील ५ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात ३६ जणांचे उपचार पूर्ण झाल्याने शहरातील ९, तर ग्रामीणमधील २७ जण घरी परतले. सध्या २९१ बाधितांवर उपचार सुरू आहेत.
शहरात १२, तर ग्रामीण भागात १६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १ लाख ४७ हजार ३७२ कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी १ लाख ४३ हजार ५६८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. उपचारादरम्यान ३ हजार ४९५ बाधितांचा मृत्यू झाल्याने सध्या २९१ उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
--
मनपा हद्दीत १२ रुग्ण
--
घाटी परिसर १, मिलिंदनगर १, बीड बायपास परिसर ३, बालकिशननगर २, मुकुंदवाडी १, अन्य ४
--
ग्रामीण भागात १६ रुग्ण
--
शेंद्रा एमआयडीसी १, गंगापूर १, बजाजनगर १, अन्य १३
---
पाच बाधितांचा मृत्यू
--
घाटी रुग्णालयात लोणी येथील ६५ वर्षीय महिला, गंगळवाडी येथील ४५ वर्षीय पुरुष, बालाजीनगर येथील ६६ वर्षीय पुरुष, खाजगी रुग्णालयात बालानगर येथील ५५ वर्षीय पुरुष, पिंपळगाव येथील ३७ वर्षीय पुरुष बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.