शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

जिल्ह्यात २८१ टँकरने पाणी

By admin | Published: May 02, 2016 11:56 PM

लातूर : लातूर शहरासह जिल्हा भरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भीषण पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत़

तीव्र टंचाई : दहा तालुक्यात ७९१ गावातून १३०० विहीरींचे अधिग्रहणलातूर : लातूर शहरासह जिल्हा भरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भीषण पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत़ जिल्ह्यातील एकूण ७९१ गावातून १३०० विहीरींचे अधिग्रहण जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़ टंचाईग्रस्त २५४ वाढी तांड्यावर २८१ टँकरने सध्याला पाणीपुरवठा केला जात आहे़ लातूर जिल्ह्यातील जळकोट उदगीर देवणी अहमदपूर आदी तालुक्यातील डोंगराळ भागातील खेड्या-पाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ विशेष म्हणजे जळकोट तालुक्यातील वाढी तांड्यावर पाण्याचे मोठे दुर्भीक्ष आहे़ एकूण १० तालुक्यातील ७९१ गावांमध्ये १ हजार ३०० विहीरींचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे़ तर जिल्ह्यातील २१० गावे आणि ४४ वाड्यांवर एकूण २५४ ठिकाणी २८१ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ यामध्ये लातूर तालुका ३१ गावे आणि १ वाड्यावर ४२ टँकर तर ११० गावात १९२ विहीरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे़ औसा तालुक्यातील २१ गावे आणि २ वाड्यामध्ये २४ टँकरद्वारे, ११६ गावात १९३ विहीरींचे अधिग्रहण, रेणापूर तालुक्यातील १६ गावे आणि ४ वाड्यामध्ये २१ टँकर आणि ७३ गावाामध्ये १०४ विहीरींचे अधिग्रहण, उदगीर तालुक्यातील ३१ गावे व १४ वाड्यात ४५ टँकरदने सध्याला पाणीपुरवठा केला जात आहे़ याच तालुक्यातील ७७ गावांसाठी १२१ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ अहमदपूर तालुक्यातील ३१ गावे आणि ९ वाड्यांवर ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ याच तालुक्यातील १०२ गावांसाठी १४५ विहीरींचे अधिग्रहण प्रशासनाकडून करण्यात आले आहे़ चाकूर तालुक्यातील २५ गावे १ वाड्यामध्ये २८ टँकर तर ८३ गावांसाठी ११७ विहीरींचे अधिग्रहण, देवणी तालुक्यातील १३ गावे आणि ३ वाड्या १३ टँकरद्वारे तर ३४ गावात ५४ विहीरींचे अधिग्रहण, जळकोट तालुक्यातील २० गावे आणि ७ वाड्यामध्ये २६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ जळकोट तालुक्यातील ३८ गावात ५३ विहीरींचे अधिग्रहण, निलंगा तालुक्यातील १६ गावे आणि ३ वाड्यांमध्ये २५ टँकरने पाणीपुरवठा तर १२१ गावांसाठी २५७ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ तर शिरुर अनंतपाळ तालुक्यातील ६ गावांसाठी ६ टँकरने सध्याला पाणीपरुवठा केला जात आहे़ पाणीटंचाई लक्षात घेता तालुक्यातील ३७ गावांसाठी ६४ विहीरींचे अधिग्रहण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़ उपाययोजना : १६७ नव्या विंधन विहीरी़़़जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २०१५ -१६ अंतर्गत लातूर जिल्हा परीषदेच्या वतीने नळ योजना विशेष दुरुस्तीच्या २२ योजना तर नविन १६७ विंधन विहीरी, १० विशेष दुरुस्ती, २५ पुरक नळयोजना, ८४ विहीरींचे खोलीकरण व गाळ काढणे आदी उपाययोजना मंजूर करण्यात आल्या आहेत़