हिंगोली : जिल्ह्यात ग्रामीण भागात शौचालय बांधकामांनी घेतलेली गती प्रोत्साहन निधी नसल्याने मंदावली होती. आता १५ कोटी एवढा निधी मिळाल्याने शौचालय बांधकाम करणाºयांना प्रोत्साहन मिळणार आहे. २९0 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून २७३ अजूनही शिल्लक आहेत.हिंगोली जिल्ह्यात औंढा तालुक्यातील १0१ पैकी ७२, हिंगोलीत १११ पैकी ७२, वसमतला ११९ पैकी ५९, कळमनुरीत १२५ पैकी ५७, सेनगावात १0७ पैकी ३0 ग्रा.पं. हागणदारीमुक्त झाल्या आहेत. तर औंढा-२९, हिंगोली-३९, वसमत-६0, कळमनुरी-६८ व सेनगावात ७७ अशी शिल्लक ग्रा.पं.ची संख्या आहे. सेनगाव हा सर्वात पिछाडीवर असलेला तालुका आहे. केवळ २८ टक्के काम झाले आहे. तर औंढ्यात सर्वाधिक ७१ टक्के काम झाले आहे. २0१७-१८ या आर्थिक वर्षातच हागणदारीमुक्त झालेल्या ग्रा.पं.ची संख्या औंढा-३५, हिंगोली-४२, वसमत-१६, कळमनुरी-३५ तर सेनगाव २0 अशी आहे.यामध्ये यावर्षी ८५ हजार ४२६ शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट आहे. यापैकी ४३ हजार ६३३ बांधकामे पूर्ण झाली आहेत. यात हिंगोलीत १३३९२ पैकी ८७६६, औंढ्यात १२७४९ पैकी ८0६९, वसमतला -१८७0३ पैकी १0७२२, कळमनुरीत २00२६ पैकी ८२३५ तर सेनगावात २0५५६ पैकी ७८४१ एवढे उद्दिष्ट गाठले आहे.प्रत्येक तालुक्याला प्रतिदिन ११४ ते ३११ एवढे शौचालय बांधकाम केले तर उद्दिष्टपूर्ती होणार आहे. मार्चपर्यंत हे उद्दिष्ट गाठणे शक्य झाले असते. मात्र मध्यंतरी प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यासाठी निधीच नव्हता. त्यामुळे अनेकांनी शौचालय बांधकाम केले अन् हा निधीच न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला. निदान अर्धी रक्कम तरी शासनाकडून मिळणार असल्याने अनेकांनी उत्साहाने ही कामे केली होती. ऐन पावसाळ्यात या कामांना गती आली होती. नंतर गावातील काही लोकांनी बांधकाम करूनही त्यांना प्रोत्साहन अनुदान मिळत नसल्याने त्याचा परिणाम इतरांवर झाला होता.आता शासनाने १५ कोटी रुपये या योजनेसाठी दिले आहेत. तर इतर योजनांतून यासाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात पुन्हा या बांधकामांना गती मिळेल, अशी आशा दिसून येत आहे. शासनाकडे हिंगोली जिल्ह्याने अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. आणखी तीन ते चार कोटींची देणी शिल्लक राहतील, अशी परिस्थिती आहे. मात्र आता कामे करणाºयांना मार्च एण्डपर्र्यत प्रोत्साहन अनुदानाचा निधी मिळू शकतो. त्यामुळे मंदावलेली गती पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२९0 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:49 PM
जिल्ह्यात ग्रामीण भागात शौचालय बांधकामांनी घेतलेली गती प्रोत्साहन निधी नसल्याने मंदावली होती. आता १५ कोटी एवढा निधी मिळाल्याने शौचालय बांधकाम करणाºयांना प्रोत्साहन मिळणार आहे. २९0 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून २७३ अजूनही शिल्लक आहेत.
ठळक मुद्दे२७३ ग्रा.पं.त अजूनही काम बाकी : ५१ टक्क्यांपर्यंत उद्दिष्टपूर्ती, १४ कोटींच्या निधीचेही वितरण