शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

गणवेशासाठी २.९९ कोटी मंजूर

By admin | Published: July 15, 2017 12:12 AM

हिंगोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजना शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी २ कोटी ९९ लक्ष १७ हजार ६०० रूपये निधी शासनाकडून मंजूर झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजना शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी २ कोटी ९९ लक्ष १७ हजार ६०० रूपये निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. एकूण ७४ हजार ७९४ शालेय गणवेशाची रक्कम विद्यार्थी-पालकाच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.सदर निधी संबंधित गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लवकरच वर्ग करण्यात येणार आहे. गणवेश योजनेतील लाभार्थ्यांची माहिती गुगल फॉर्मवर भरून देण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी दिल्या होत्या. परंतु ७४ हजार ७९४ पैकी केवळ २ हजार ५१८ विद्यार्थ्यांची माहिती गुगलवर फॉर्मवर भरण्यात आली. त्यामुळे उर्वरित ७१ हजार ४८२ विद्यार्थ्यांची माहिती अजूनही अप्राप्त आहे. ज्यांचे बँकखाते आहेत, त्यानांच योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी विद्यार्थ्यांची माहिती तत्काळ सर्व शिक्षाकडे भरून देणे अनिवार्य आहे. याबाबत वेळोवेळी शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी आवाहनही केले होते. मात्र गशिअ व मुख्याध्यापकांकडून सदर माहिती भरण्यास दिरंगाई केली जात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या गणवेश योजनेची माहिती भरण्यासाठी सर्व शिक्षाने गुगल फॉर्म तयार केला आहे. मात्र सदर गुगलफॉर्मवर केवळ २५१८ जणांनी माहिती भरली आहे. उर्वरित लाभार्थ्यांची अद्याप माहिती अप्राप्तच असल्याचे सर्व शिक्षा विभागाकडून सांगण्यात आले.