शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

शेतकऱ्यांकडे ३ हजार कोटी बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 12:44 AM

औरंगाबाद परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत ३ लाख ४० हजार ८०४ कृषिपंप असून, त्यांच्याकडे २ हजार ७६१ कोटी ५७ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. कृषिपंपांच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी महावितरणने यापूर्वी अनेकदा राबविलेल्या कृषी संजीवनी योजनेलाही शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी महावितरणने १० हजार ५४० कृषिपंपांचा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केला आहे.

ठळक मुद्देमहावितरण : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांत प्रचंड उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत ३ लाख ४० हजार ८०४ कृषिपंप असून, त्यांच्याकडे २ हजार ७६१ कोटी ५७ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. कृषिपंपांच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी महावितरणने यापूर्वी अनेकदा राबविलेल्या कृषी संजीवनी योजनेलाही शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी महावितरणने १० हजार ५४० कृषिपंपांचा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केला आहे.यासंदर्भात औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, कृषिपंपांना सवलतीच्या व नाममात्र दरात वीजपुरवठा केला जातो. तरीही अनेक शेतकरी वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे वीज बिलाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असून, महावितरणला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.कृषिपंपांकडे असलेली वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी सातत्याने मोहिमा राबविल्या जातात; पण अपेक्षित थकबाकी व वीज बिलांची वसुली होत नाही, तर दुसरीकडे वीज खरेदी, पुरवठा यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती, कर्मचाºयांवर महावितरणला खर्च करावा लागतो.वीज खरेदीसाठी पूर्वीसारखी उधारीची परिस्थिती राहिलेली नाही. वेळच्या वेळी वीज खरेदीचे बिल महावितरणला चुकते करावे लागते.औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. त्यामुळे कृषी संजीवनी ही व्याज व दंडाची ५० टक्के रक्कम माफ करणाºया योजनेला मुदतवाढ मिळते का, याकडे आमचे लक्ष आहे. सध्या केवळ घरगुती, व्यापारी, औद्योगिक, पाणीपुरवठा, आदी ग्राहकाचीे थकबाकी वसुलीला प्राधान्य दिले असून, वीज चोरी व गळती रोखण्यावर भर आहे.दोन जिल्ह्यांतील कृषिपंपांची सद्य:स्थितीऔरंगाबाद परिमंडळात औरंगाबाद शहर मंडळ, औरंगाबाद ग्रामीण मंडळ आणि जालना मंडळाचा समावेश आहे. औरंगाबाद शहर मंडळामध्ये सध्या २ हजार १४२ कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरू असून, त्यांच्याकडे १७ कोटी ५९ लाख रुपये थकबाकी आहे, तर कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या कृषिपंपांची संख्या ४८५ एवढी असून, त्यांच्याकडे १ कोटी ९ लाख रुपये थकबाकी आहे.औरंगाबाद ग्रामीण मंडळात वीजपुरवठा चालू असलेले २ लाख १५ हजार ४८४ कृषिपंप असून, त्यांच्याकडे १,६१९ कोटी २३ लाख रुपये थकबाकी आहे, तर कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या कृषिपंपांची संख्या ७ हजार ८६८ एवढी असून, त्यांच्याकडे १३ कोटी ७७ लाख रुपये थकबाकी आहे.जालना मंडळात सध्या वीजपुरवठा चालू असलेले १ लाख २३ हजार १७८ कृषिपंप असून, त्यांच्याकडे १ हजार १२४ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी आहे, तर कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेले २ हजार १८७ कृषिपंप असून, त्यांच्याकडे ३ कोटी ८ लाख रुपये थकबाकी आहे.दोन्ही जिल्ह्यांतील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या कृषिपंपांची संख्या १० हजार ५४० एवढी असून, त्यांच्याकडे १७ कोटी ९४ लाख रुपये थकबाकी आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र