- मुजीब देवणीकरछत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे. तिन्ही तुल्यबळ उमेदवारांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आपली शक्ती पणाला लावली. हिंदू मतांचे विभाजन झाले तरच ‘एमआयएम’चा उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे हिंदू मतांचे विभाजन हाेऊ नये यासाठी उद्धवसेना आणि शिंदेसेना सरसावली आहे. विरुद्ध बाजूला वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम मतांवर डोळा ठेवत अल्पसंख्याक चेहरा मैदानात उतरविल्याने एमआयएम पक्षाची दमछाक होत आहे. मतदारसंघात नेमका कोणता झेंडा फडकेल, हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होईल.
मध्य मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असे समीकरणच मागील काही वर्षांत तयार झाले. २००९ मध्ये अपक्ष, २०१९ मध्ये शिवसेनेकडून प्रदीप जैस्वाल निवडून आले. आता शिंदेसेनेकडून ते निवडणूक मैदानात आहेत. उद्धवसेनेतर्फे बाळासाहेब थोरात तर एमआयएम पक्षाने २०१९ चे उमेदवार नासेर सिद्दीकी यांच्यावरच विश्वास दाखविला. वंचितने जावेद कुरैशी, मनसेकडून सुहास दाशरथे मैदानात आहेत. २०१४ मध्ये या मतदारसंघात प्रदीप जैस्वाल आणि किशचंद तनवाणी यांच्यात मतांची विभागणी झाली. एकत्रित मुस्लिम मतांच्या बळावर इम्तियाज जलील निवडून आले होते. आताही परिस्थिती तशीच निर्माण झाली आहे. जैस्वाल यांच्या व्होट बँकेला थोरात किती सुरुंग लावतात, सिद्दीकी यांची किती मुस्लिम मते कुरैशी आपल्याकडे ओढतात यावर सर्वकाही अवलंबून आहे.
प्रदीप जैस्वाल यांच्या दोन्ही बाजूजमेच्या बाजू- मतदारसंघात ६०० कोटींचा निधी आणल्याचा दावा.- महापालिका, पोलिस प्रशासनावर नेहमीच पकड.- सर्वसामान्यांसाठी उपलब्ध अशी ओळख.- लोकसभेला शिंदेसेनेला चांगले मतदान.- मतदारसंघात सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध.
उणे बाजू- अडीच वर्षांत क्वचितच घराबाहेर.- मागील वेळेसच शेवटची निवडणूक म्हटले.- पाणीप्रश्न न सोडविल्याचा आरोप.- हिंदू मतांचे विभाजन टाळणे अशक्य.
नासेर सिद्दीकी यांच्या दोन्ही बाजूजमेच्या बाजू- ओवेसी बंधूंच्या प्रचारावर सर्व भिस्त.- उमेदवाराचा चेहरा मतदारांना सर्वश्रुत.- सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी पुढे.- मतदारसंघात चांगली प्रतिमा.
उणे बाजू- पक्षाचे संघटनात्मक जाळे मजबूत नाही.- वंचित फॅक्टर त्रासदायक ठरू शकतो.- अन्य समाजाची मते मिळविणे अवघड.- मत विभाजनावरच गणित अवलंबून.- मित्रासोबतच इत्तेहाद नसल्याचा आरोप.
बाळासाहेब थोरातजमेच्या बाजू- मराठा चेहरा अशी ओळख.- अंबादास दानवे यांचे निकटवर्तीय.- विकासकामांचा अनुभव पाठीशी.- महाविकास आघाडीत मित्र पक्षांची मदत.- इतरांपेक्षा तरुण उमेदवार
उणे बाजू- ऐनवेळी उमेदवारीने मोठी दमछाक.- मत विभागनीचा फटका बसू शकतो- अनुभवी उमेदवारासोबत सामना.- उद्धव ठाकरे यांच्या सभेवर भिस्त.