शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

औरंगाबादकरांच्या कोरोना चाचणीवर दररोज ३० लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 4:04 AM

विषाणू निदान : ॲण्टिजनपेक्षा आरटीपीसीआर तपासणीवर भर --- औरंगाबाद : जिल्ह्यात २६ मार्चपर्यंत ६.८४ लाख जणांची कोरोना तपासणी झाली. ...

विषाणू निदान : ॲण्टिजनपेक्षा आरटीपीसीआर तपासणीवर भर

---

औरंगाबाद : जिल्ह्यात २६ मार्चपर्यंत ६.८४ लाख जणांची कोरोना तपासणी झाली. गेल्या आठवडाभरात दररोज सरासरी सहा हजारांच्या वर रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत. औरंगाबादकरांच्या रोजच्या या चाचणीसाठी सुमारे ३० लाखांचा खर्च होत आहे.

कोरोनाचे स्वॅब सुरुवातीला तपासणीला पुणे येथे एनआयव्हीला पाठवले जात होते. त्यानंतर शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विषाणू निदान प्रयोगशाळा सुरू झाली. ॲण्टिजनचीही सुविधा झाली. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या तपासण्यांत आरटीपीसीआरच्या तपासण्या चार लाखांपर्यंत झाल्या आहेत, तर अडीच लाखांच्या दरम्यान ॲण्टिजन तपासण्या झाल्या आहेत. त्यानुसार किमान २५ कोटींपेक्षा अधिक खर्च शासनाने केवळ तपासणीवर केला असण्याची शक्यता आहे, असे डॉ. गुलाब खेडकर म्हणाले.

शहरात खाजगी २ प्रयोगशाळाही सेवा देत होत्या. हजार ते १२०० रुपये ते तपासणी शुल्क आकारत होत्या. मात्र, त्यांच्या सेवा मनपाकडून गेल्या आठवड्यात बंद करण्यात आल्या. खाजगी लॅबलाही विचारणा केली असता कोरोना तपासणीला त्यांनी नकार दिला. त्यामुळे बहुतांश कोरोना तपासण्या दोन्ही शासकीय प्रयोगशाळांकडून होत आहेत.

---

शासकीय प्रयोगशाळांतील रोजच्या चाचण्यांची संख्या ४०००

खाजगी प्रयोगशाळेतील रोजच्या चाचण्यांची संख्या ३००

शासकीय प्रयोगशाळा २

खाजगी प्रयोगशाळा २

---

६०००

जिल्ह्यात दररोज केल्या जाणाऱ्या चाचण्या

--

४०,०००

चाचण्या झाल्या गत आठवड्यात

---

-जिल्ह्यात १९ ते २६ मार्चदरम्यान ४० हजार ७९८ आरटीपीसीआर सॅम्पल्स घेण्यात आले. त्यापैकी ११ हजार ५८१ रुग्ण बाधित आढळून आले.

-खाजगी लॅबमध्ये या काळात ३७०२ सॅम्पल तपासणीसाठी देण्यात आले. त्यातून १०१८ रुग्ण बाधित आढळून आले.

-आतापर्यंत खाजगी लॅबमध्ये २९ हजार ५२८ तर शासकीय प्रयोगशाळेसह ॲण्टिजनच्या माध्यमातून ६ लाख ५४ हजार ९९२ तपासण्या २६ मार्चपर्यंत करण्यात आल्या.

----

१ ०००

रुपये खर्च येतो एका चाचणीला

---

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेचे प्रमुख डाॅ. गुलाब खेडकर म्हणाले, तपासणीसाठी लागणारे यंत्र, कन्झ्युमेबलसह मनुष्यबळ शासनच पुरवत असल्याने निश्चित एका तपासणीचा खर्च किती येतो हे सांगता येणे कठीण आहे. मात्र, वेगवेगळ्या तीन प्रक्रिया, त्यासाठी लागणाऱ्या कन्झ्युमेबलचा खर्च प्रतिचाचणी ५०० रुपयांच्या घरात जात असल्याचा अंदाज आहे. त्याशिवाय मनुष्यबळ, प्रयोगशाळा उभारणी खर्च, स्वॅब घेणारी यंत्रणा, त्या स्वॅबला लॅबपर्यंत पोहचवण्यासह रिपोर्ट पोहचवणे, काॅन्टॅक्ट ट्रेसिंगचा खर्च यापेक्षा वेगळा आहे. खाजगीत एका तपासणीला एक हजार रुपये मोजावे लागतात.