गंगाखेड : गोदावरी नदीपात्रातून अनधिकृतरित्या उत्खनन करून जमा केलेले वाळूसाठे जप्तीनंतर चोरीस गेल्याने तलाठी होनमने यांनी २० मार्च रोजी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे़ यामध्ये २७ जणांविरूद्ध गुन्हे नोंद झाले आहेत़ गंगाखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देऊळगाव दुधाटे (ता़पूर्णा) येथून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रातून २८ जून २०१५ पूर्वी अनाधिकृतपणे वाळू उपसा करण्यात आला़ यामध्ये केशव बापूराव दुधाटे (३१ ब्रॉस), सुदाम सोनाजी दुधाटे (२७ ब्रास), विठ्ठल रामराव दुधाटे (२० ब्रास), विठ्ठल सोपान दुधाटे (१९ ब्रास), सखाराम गंगाराम दुधाटे (१६ ब्रास), बळीराम गोरख दुधाटे (३२ ब्रास), प्रकाश उत्तम दुधाटे (३२ ब्रास), गजानन साहेबराव दुधाटे (५७ ब्रास), सुधाकर मधुकर दुधाटे (५७ ब्रास), गोविंद सोपान दुधाटे (५९ ब्रास), रमाकांत सखाराम दुधाटे (३६ ब्रास), पांडुरंग सोपान दुधाटे (२२ ब्रास), प्रकाश उत्तम दुधाटे (३४ ब्रास), नारायण नागोराव दुधाटे (२५ ब्रास), राम गंगाराम दुधाटे (१८ ब्रास), गोविंद बालासाहेब दुधाटे (१६ ब्रास), रंगनाथ बाबाराव दुधाटे (३६ब्रास), आत्माराम नागोराव दुधाटे (२३ ब्रास), विशाल आत्माराम दुधाटे (४० ब्रास), रामेश्वर मुंजाजी दुधाटे (१४ ब्रास) व अन्य ८ अज्ञात व्यक्तींनी ९ लाख ८३ हजार ८५६ रुपयांची ८२४ ब्रास वाळू चोरून नेल्या प्रकरणी तलाठी दत्ता होनमने यांनी २० मार्च रोजी गंगाखेड पोलिस ठाण्यात वाळूचोरीचा गुन्हा दाखल केला आहे़ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बळीराम जाधव, जमादार ुदादाराव जाधव करीत तपास आहेत़ गंगाखेड परिसरातील अनेक वाळू साठ्यांचा लिलाव झाला नसल्याने वाळू माफियांनी हे वाळूसाठे परस्पर उचलून नेल्याचे समोर आले आहे़
गंगाखेडमध्ये जप्त केलेले ३० वाळूसाठे झाले गायब
By admin | Published: March 20, 2016 11:31 PM