लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: फिफा फुटबॉल वर्ल्डकप २०१७ अंतर्गत फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र मिशन, एक मिलीयन फुटबॉल सामन्याचे १५ सप्टेंबरला जिल्हाभरात आयोजन करण्यात येणार आहे़ त्यामध्ये जिल्ह्यातील जवळपास ३० हजार खेळाडू फुटबॉल खेळतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली़क्रीडा विभागाच्या आवाहनानुसार शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या वतीने मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, क्रीडाशिक्षक, तालुका क्रीडा संयोजक आदींची शनिवारी बैठक घेण्यात आली़ आॅक्टोबर महिन्यात १७ तारखेला जागतिक फुटबॉल स्पर्धेचे देशात सहा ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे़ त्यामध्ये राज्यात डी़वाय़पाटील स्टेडियम मुंबई येथेही सामने होणार आहेत़ त्यासाठी वातावरण निर्मिती व राज्यातील खेळाडूंत फुटबॉलची आवड निर्माण व्हावी, यासाठी शासनाच्या वतीने सर्व शाळांमधून १५ सप्टेंबरला फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे़ याबाबत जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले, खेळातून सकस मन तयार होते़आज जगात अनेक खेळ खेळले जातात, परंतु व्यस्त शिक्षण संस्कृती व मोबाईल गेममध्ये गुरफटून गेलेली मुले अभावानेच मैदानावर खेळताना दिसतात़ त्यामुळे खºया अर्थाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खीळ बसत आहे़ त्यासाठी पालक, शिक्षकांनी खेळाला प्राधान्य देण्याची गरज आहे़ तर उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी फुटबॉल स्पर्धेची वातावरणनिर्मिती करण्यासाठी मनपाने नियोजन केले असून इंदिरा गांधी मैदान उपलब्ध करुन देण्यात आले़ तसेच खेळाडूंना रात्रीच्या वेळी खेळण्यासाठी फ्लड लाईडची व्यवस्था केल्याचे ते म्हणाले़जिल्हा क्रीडाधिकारी गंगालाल यादव म्हणाले, संपूर्ण जिल्हा फुटबॉलमय करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या शाळांना फुटबॉलचे वितरण करण्यात येणार आहे़ शाळांनी उपलब्ध असलेल्या मैदानावर फुटबॉलचे सामने आयोजित करावेत़ बैठकीस उपायुक्त संतोष कंदेवाड, शिक्षणाधिकारी जयश्री गोरे, शिवाजीराव खुडे, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, रामलू पारे, फुटबॉल खेळाडू जगदीश गादेवाड यांची उपस्थिती होती़
३० हजार विद्यार्थी खेळणार फुटबॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:25 AM