बीड : होळीच्या सणाला लाकडे, गवऱ्या जाळण्याच्या परंपेरला फाटा देत ३० गावांनी कचऱ्याची होळी करून गाव पाणंदमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. पाण्याचा अपव्यय टाळून धुळवडीला कोरडे रंग वापरण्याचेही ठरवले आहे.स्वच्छत भारत मिशनच्या वार्षिक आराखड्यात १०५ ग्रामपंचायतींचा समावेश असून, त्यापैकी निम्म्या ग्रामपंचायती पाणंदमुक्त जाहीर झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायती ३१ मार्चपूर्वी पाणंदमुक्त करण्यासाठी स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग झपाट्याने कामाला लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून होळी-धुळवडीच्या मुहुर्तावर ३० गावांमध्ये पाणंदमुक्तीचा झेंडा फडकविला जाणार आहे.तालुकानिहाय गावेबीड - बाभूळवाडी, लोणीघाट, शिदोड, केज - बानेगाव, सुर्डी, सातेफळ, अंबाजोगाई - नागझरी, पिंप्री, परळी - दौंडवाडी, कौठळी, वाका, सावळेवाडी, धारूर - खोडस, चोरंबा, वडवणी - केंडेपिंप्री, कोठरबन, माजलगाव - आबेगाव, मनूरवाडी, सोमठाणा, भाटवडगाव, मोठीवाडी, शिरूर कासार - सावरगाव चकला, बावी, नांदेवली, आष्टी - चिंचोली, कानडी, उंदरखेल, पाटोदा - सादळवाडी, तळेपिंपळगाव, निरगुडी या ग्रामपंचायती पाणंदमुक्त होणार आहेत. (प्रतिनिधी)
कचऱ्याची होळी करून ३० गावे होणार पाणंदमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2016 12:04 AM