अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मांजरा प्रकल्पातील गाळ काढण्याच्या कामाला दोन दिवसांपूर्वी प्रारंभ झाला असून, दोन दिवसांत तीनशे ट्रक गाळ उपसा झाला असल्याची माहिती मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी बुधवारी सांगितले.बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याला पाणीपुरवठा करणा-या मांजरा प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी आता मानवलोक या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे.या मोहिमेचा आज दिनांक ३ मे रोजी शुभारंभ करण्यात आला.मानवलोकच्या वतीने मांजरा धरणातील गाळ काढण्याचा आज दिनांक ३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, डॉ. द्वारकादास लोहिया, राजकिशोर मोदी, नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते व अशोकराव देशमुख, अॅड.विष्णुपंत सोळंके, अनिकेत लोहिया, विठ्ठलराव जाधव, जयसिंग चव्हाण, वैजेनाथ देशमुख यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. याकामी मानवलोकला महाराष्ट्र शासनासोबतच केअरींग फ्रेंड्स आणि गिव्ह इंडिया या संस्थांचे मिळत आहे सहकार्य. येथून काढण्यात येणारा गाळ मागेल त्या शेतकऱ्याला मोफत देण्यात येणार आहे. तसेच, याकामाची सुरूवात अंबाजोगाईच्या पंप हाऊसच्या परिसरापासून करण्यात आल्याने याठिकाणी पाणी संचय होण्यास मोठी मदत होणार आहे, परिणामी भविष्यात अंबाजोगाईसाठीच्या पाणी पुरवठ्यावर चांगला परिणाम होण्याची शक्यता. (वार्ताहर)स्तुत्य उपक्रम : सेवाभावी संस्थांनी पुढे यावेमांजरा प्रकल्पातील गाळ काढण्याच्या उपक्रमाला सर्वस्तरातून सहकार्य मिळत आहे. अजून सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन गाळ काढण्याच्या कामाला हातभार लावावा, असे आवाहन मानवलोकचे अनिकेत लोहिया यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना केले आहे. दोन पोकलेन व ४० वाहनांद्वारे गाळ निघत आहे.
३०० ट्रक गाळ उपसला
By admin | Published: May 05, 2016 12:09 AM