रस्त्यावर थुंकण्यासाठी एकूण ५ नागरिकांकडून ५०० रुपये दंड वसूल केला. विनामास्क फिरणाऱ्या एकूण ३४ नागरिकांकडून १७ हजार रुपये, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या चार नागरिकांकडून सहाशे रुपये दंड वसूल करण्यात आला. दुकानासमोर कचरा लावल्याबद्दल पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकले २ हजार, प्रतिबंधित कॅरिबॅगचा वापर केल्याबद्दल पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
मनपाकडून २,४६१ नागरिकांची तपासणी
औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शनिवारी २,४६१ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली. ३६६ नागरिकांची अँटिजन पद्धतीने टेस्ट करण्यात आली. यामध्ये फक्त आठ जणांना बाधा झाल्याचे उघडकीस आले. २ हजार ९५ नागरिकांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.