छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातीन नऊ विधानसभा मतदारसंघातील नऊ आमदारांचे ३१ लाख ७६ हजार ८३० मतदार भवितव्य ठरविणार आहेत. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपजिल्हाधिकारी देवेेंद्र कटके यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात १५ लाख २४ हजार ८४७ पैकी सुमारे १३ लाख महिला मतदार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत.
४१५० नावे वगळणारजिल्ह्यातील मतदार यादीत ३६ हजार दुबार नावे असल्याच्या १४ तक्रारी आल्या. तपासणी केल्यानंतर त्यात विशेष असे तथ्य आढळले नाही. २ हजार २२ दुबार नावे यादीतून वगळली. तर २१२८ मतदारांची नावे वगळण्यासाठी आयोगाकडून परवानगी मागितली आहे, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
किती शस्त्रे जमा करणार?शहर : १०७५ग्रामीण : ५२५
शहरातील बंदोबस्त असा :शहरातील ३ मतदारसंघासाठी ४ डीसीपी, ७ एसीपी, ७० पीआय/एपीआय, १२५ पीएसआय, ३५०० पोलिस अंमलदार, ५०० होमगार्डसह सेंट्रल पॅरामिल्ट्री फोर्सच्या ४ तुकड्या व ४ एसआरपीएफच्या तुकड्या तैनात असतील, असे पोलिस आयुक्त पवार यांनी सांगितले.
ग्रामीण बंदोबस्त असा :ग्रामीणमध्ये ६ मतदारसंघ आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक, २४१५ अंमलदार, १४८६ होमगार्ड, ४ एसआरपीएफच्या तुकड्या, ६ सेंट्रल पॅरामिल्ट्री फोर्सच्या तुकड्या आचारसंहितेत बंदोबस्तासाठी असतील, असे पोलिस अधीक्षक राठोड यांनी सांगितले.
प्रशासकीय यंत्रणा अशी राबणारजिल्ह्यातील ९ मतदासंघात १६ हजार कर्मचारी मतदान व मतमोजणी प्रक्रियेत असतील. ९ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अखत्यारित हे कर्मचारी काम करतील.
ऑनलाइन मतदान केंद्र किती?शहरात १२९० तर ग्रामीण भागातील १९८३ पैकी ५० टक्के मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया वेबकास्ट (ऑनलाइन) द्वारे पाहिली जाईल.
किती मतदार घरून करू शकतात मतदान?६० हजार मतदार घरून मतदान करू शकतात. ही प्रक्रिया ऐच्छिक आहे.
उमेदवाराला प्रचार खर्च मर्यादा किती?४० लाख एका मतदारसंघासाठी खर्च मर्यादा आहे. सर्व परवानगींसाठी मतदारसंघनिहाय एक खिडकी असेल.
राजकारण्यांचे बॅनर काढण्यासाठी ७२ तासशहर, जिल्ह्यातील राजकीय नेते व पक्षांनी लावलेले होर्डिंग्ज, बॅनर काढण्यासाठी ७२ तासांची मुदत प्रशासनाने दिली आहे.
विधानसभा निवडणूक कार्यक्रम- २२ ऑक्टोबरला निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध होईल.- २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत.- ३० ऑक्टोबर रोजी उमेदवार अर्जांची छाननी.- ४ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत.- २० नोव्हेंबरला मतदान होईल.- २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.- २५ नोव्हेंबरला निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.
जिल्ह्यातील महिला व पुरुष मतदारमहिला मतदार : १५२४८४७
पुरुष मतदार : १६५१८४०तृतीय पंथीय मतदार : १४३
जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय मतदारसिल्लोड : ३५५२८०कन्नड : ३३०८००फुलंब्री : ३६५७५५औरंगाबाद मध्य : ३६६२८४औरंगाबाद पश्चिम : ४०३१३७औरंगाबाद पूर्व : ३५२३१३पैठण : ३२३५००गंगापूर : ३६१२१८वैजापूर : ३१८५४३एकूण : ३१७६८३०