शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

३३ स्वस्त धान्य दुकानांवर होणार निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 1:07 AM

३३ दुकानांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा विभागाने तालुका पुरवठा अधिकाºयांना दिल्या

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ई-पॉस मशीनद्वारे धान्य वाटप करताना मागील तीन महिन्यांत ज्या स्वत धान्य दुकानदारांची आधार कार्ड पडताळणी दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा ३३ दुकानांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा विभागाने तालुका पुरवठा अधिकाºयांना दिल्या असून २५ टक्क्यांपेक्षा कमी आधार पडताळणी असणाºया ५२ दुकानांचा धान्य कोटा कमी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.जालना जिल्ह्यात १२८० स्वस्तधान्य दुकाने असून, लाभार्थ्यांची संख्या दोन लाख ८८ हजार ३५२ एवढी आहे. जिल्हा पुरवठा विभागाने प्रत्येक स्वस्तधान दुकानदारास ई-पॉस मशीनचे वाटप केले आहे. प्रत्येक लाभार्थ्यास ई-पॉसद्वारेच धान्य वाटप करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. स्वस्तधान्य दुकानदारांकडून याची अंमलबजावणी सुरू असली तरी काही तालुक्यांमध्ये ईपॉसद्वारे धान्य वाटपानंतर आधार पडताळणीचे प्रमाण कमी आहे. बदनापूर व भोकरदन तालुक्यातील आधार पडताळणीचे प्रमाण सर्वात कमी आहे. याबाबत सूचना देण्यासाठी सोमवारी जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांनी जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकानदारांची बैठक घेतली. जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याअखेर ई-पॉसद्वारे दोन लाख ४२ हजार ९३८ लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यात आले असून, आधार पडताळणीचे प्रमाण ५८.१० टक्के आहे. आधार पडताळणीचे प्रमाण शंभर टक्के करण्यासाठी सर्व स्वस्तधान्य दुकानदारांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना नंदकर यांनी दिल्या. मागील तीन महिन्यांत आधार पडताळणीचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी असणाºया स्वस्तधान्य दुकानांचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी तालुका पुरवठा अधिकाºयांना दिल्या. आधार पडताळणीचे प्रमाण ९८ टक्क्यांपर्यंत असणाºया सुभाष गाडगे, राजू लहाने, रंगनाथ नागरे या स्वस्तधान्य दुकानदारांचा पुरवठा अधिकारी नंदकर यांनी सत्कार केला.