शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

१८ राज्यांतील ३४१ भाविकांनी उसाचा रस ग्रहण करत सोडला वर्षभराचा उपवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 7:59 AM

आचार्य महाश्रमणजींच्या साक्षीने अक्षय्य तृतीया महोत्सव ठरला ऐतिहासिक

लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : काहींनी वर्षभर तर काहींनी ३ वर्ष, ४ वर्ष उपवास केले. अशा १८ राज्यांतील ३४१ भाविकांनी  शुक्रवारी (दि. १०) अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जैन श्वेतांबर तेरापंथ धर्म संघाचे आचार्यश्री महाश्रमणजींच्या साक्षीने एकाचवेळी उसाचा रस ग्रहण करत उपवास सोडला. यावेळी उपस्थित हजारो समाजबांधवांनी ‘उपवास करनेवालो को अनुमोदना’ असे म्हणत उपवासधारकांचा सन्मान केला.

आचार्यश्री महाश्रमणजींच्या मार्गदर्शनाखाली एक ऐतिहासिक सोहळा अनुभवल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. ‘एक दिवस उपवास, एक दिवस जेवण’ असे करत वर्षभर उपवास करणाऱ्या उपवासधारकांना आचार्यश्रींचे दर्शन घडले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील थकवा निघून गेला होता. नवचैतन्य निर्माण झाले होते. हा क्षण पाहून अनेकांच्या मनात उपवास करण्याची भावना निर्माण झाली आणि त्याचवेळी शेकडो भाविकांनी पुढील वर्षभर उपवास करण्याचा संकल्प केला. जैन श्वेतांबर तेरापंथ धर्म संघाचे ११ वे आचार्यश्री महाश्रमणजींच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी ‘अक्षय्य तृतीया वर्षतप पारणा महोत्सव’चे आयोजन करण्यात आले होते. चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील प्रेसिडेंट लॉन्सच्या पाठीमागील बाजूला असलेल्या जागेवर भव्य मंडप उभारण्यात आला होता.  

धर्मपीठावरून उपवासधारकांचे नाव घेतले जात होते व उपवासधारक छोट्या वाटीत उसाचा रस घेऊन रांगेत उभे होते. नंबर आल्यावर आचार्यश्रींचे आशीर्वाद घेत व समोर ठेवलेल्या भांड्यात थोडा थोडा उसाचा रस टाकत होते. त्यानंतर सर्व उपवासधारकांनी उसाचा रस पिऊन उपवास सोडला. या सोहळ्याला सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आचार्यश्री महाश्रमण अक्षय्य तृतीया प्रवास व्यवस्था समितीचे अध्यक्ष सुभाष नहार, डॉ. अनिल नहार, सुनील राका, राजेंद्र डोसी, संजय सेठिया, महेंद्र सुराणा, कौशिक सुराणा, अंकुर लुणिया, राजकुमार बांठिया, तेरापंथ युवक परिषदेचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. 

२५ उपवासधारकांचा समावेश वर्षभर उपवास करणाऱ्या ३४१ भाविकांमध्ये २५ जण छत्रपती संभाजीनगरातील आहेत. त्यात तेरापंथी समाजातील १४ व सकल जैन समाजातील ११ भाविकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील १२९ भाविकांनी वर्षतप पारणा केला. 

४२ वर्षांपासून उपवास करणारी महिला छत्रपती संभाजीनगरची     मागील वर्षभर उपवास करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक ४२ वर्षांपासून उपवास करणाऱ्या  शांताबाई कोठारी (सिडको, छत्रपती संभाजीनगर),  केसरबाई जैन (पिंपळनेर) यांनी ४० वा वर्षतप पारणा तर कमलादेवी कोचर  (बिकानेर) यांनी ३३ वर्षतप केले.     २१ वर्षांची विकलांग मुलगी लक्षिता लोढा हिने वर्षभर उपवास केला.     साधू-साध्वीजींनीही वर्षतप पारणा केला. यात मुनी लक्ष्यकुमारजी, मुनी राजकुमारजी, मुनी अजितकुमारजी, मुनी चिन्मयकुमारजी व अन्य तीन साध्वीजींनी वर्षतप पारणा केला.