लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पोलिसांनी अचानक कोंबिंग आॅपरेशन राबवून रविवारी तब्बल ३५-४० संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेतले. यामध्ये उस्मानाबादसह चौसाळा, नेकनूर परिसरातील गुन्हेगारांचा समावेश आहे. दिवसभर पोलीस व गुन्हेगारांमध्ये धरपकड सुरूच होती. रात्री उशिरापर्यंत हे आॅपरेशन सुरूच होते. अधिकाºयांसह कर्मचाºयांचा मोठा फौजफाटा या भागात तैनात करण्यात आला होता.जिल्ह्यात चोरी, दरोडे, खून, घरफोड्या, साखळीचोर, वाटमारी आदी प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त होत होती. त्यातच मागील काही दिवसांत नेकनूर व चौसाळा परिसरात चोºयांचे प्रमाण वाढल्याने ही समस्या अधिकच गंभीर बनली. हाच धागा पकडून रविवारी सकाळी १० वाजेपासून चौसाळा, नेकनूर, मांजरसुंबा, केज इ. परिसरात कोंबिंग आॅपरेशन घेण्यात आले.उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक पारधी वस्तींवर स्थानिक गुन्हे शाखेसह नेकनूर पोलिसांनी छापा टाकून संशयितांना ताब्यात घेतले. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील, परंतु नेकनूर व चौसाळा परिसरात पाल ठोकून राहणाºयांचीही पोलिसांनी चौकशी केली. संशयितांना ताब्यात घेतले आहे.दरम्यान, पकडलेल्या सर्व संशयितांना चौसाळा पोलीस चौकीत आणण्यात येऊन त्यांची ओळख पटविण्यात आली. तसेच इतर गुन्हेगारांसंदर्भात त्यांच्याकडून माहिती घेण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.ही मोहीम पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाईचे अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, पोलीस उपअधीक्षक मंदार नाईक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, दरोडा प्रतिबंधकचे सपोनि श्रीकांत उबाळे, नेकनूर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांच्यासह अधिकारी, कर्मचाºयांनी राबविली.दरोड्याच्या तयारीतील टोळी केजमध्ये जेरबंदलोकमत न्यूज नेटवर्ककेज : अंधाराचा फायदा घेऊन केज - बीड राज्य महामार्गावरील सांगवी शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या व गाडीत लपून बसलेल्या चार संशयितांना केज पोलिसांनी सिने स्टाईलने जेरबंद केले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, एक बॅट, २ लाकडी दांडे, लोखंडी पाईप, बॅटरी, चार मोबाईल आणि एक चार चाकी वाहन मिळून ८ लाख ३० हजार ६५ रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. अंधाराचा फायदा घेऊन एक आरोपी फरार झाला आहे.शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे, उपनिरीक्षक अंकुश नागटिळक, पोलीस नाईक परमेश्वर वखरे, अशोक नामदास, जीवन करवंदे, हनुमंत चादर, चालक हनुमंत गायकवाड, गुजर हे केज बीड राज्य महामार्गावर पेट्रोलिंग करीत होते. याचवेळी सांगवी शिवारात अंधाराचा फायदा घेऊन एक काळ्या रंगाची गाडी थांबल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. येथे त्यांनी जीप थांबवली. पोलिसांना जवळ येताच पाहून कारजवळील [एम एच १२ जेके ३००] बाळराजे रामराव आवारे हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. बाकीचे आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी सिने स्टाईलने झटापट करीत ताब्यात घेतले. यात रामेश्वर भीमराव वाघचौरे, किशोर श्रीराम दातवासे, रमेश सुदामराव लहाने, कृष्णा वाल्मिक गोजरे [सर्वजण रा. महाकाळा, ता. अंबड, जि. जालना] यांचा समावेश आहे.पहाटे साडेतीन वाजता सरकारी पक्षाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक अंकुश नागटिळक यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध केज ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या चौघांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी महिपाल बिहारे यांनी २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
३५ संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:23 AM