लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिवाळी सुटी सुरू असल्याने राज्याची पर्यटन राजधानी असलेले औरंगाबाद शहर पर्यटकांनी गजबजून गेलेले आहे. शहरातील बीबीका मकबरा, सोनेरी महल, पाणचक्की या वास्तंूसह दौलताबादचा किल्ला, म्हैसमाळ, वेरूळ-अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केलेली आहे.ऐतिहासिक वास्तूंच्या आकर्षणापोटी देश-विदेशातील पर्यटक औरंगाबादला भेट देत असतात. दिवाळी सुटीच्या काळात कुटुंब सहलींचे प्रमाण वाढते. गेल्या आठवडाभरात एकट्या बीबी का मकब-याला सुमारे ३५ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. यंदा राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी राज्यव्यापी संप केल्याने एसटी बससेवा चार दिवस खंडित झाली होती. त्यामुळे यंदा पर्यटकांच्या संख्येवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती.
तब्बल ३५ हजार पर्यटकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:28 AM